स्वखर्चाने आणले पाणी

स्वखर्चाने आणले पाणी
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... -- फोटो क्रमांक : 28528, देशीरवाडे (ता. साक्री) : लाटीपाडा प्रकल्पच्या पाटचारीचे जेसीबीने सुरू असलेले दुरुस्तीचे काम. -- स्वखर्चाने आणले नदीचे पाणी पाण्याच्या नियोजनासाठी प्रा. काकुस्ते यांचे सामूहिक प्रयत्न सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २ : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे तालुक्यातील काटवान परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मका, बाजरी व कपाशीची तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी कोमजू लागली आहेत. विहिरी व नाले कोरडेठाक पडल्यामुळे मोठे संकट ओढवले असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. युवराज काकुस्ते यांनी पुढाकार घेतला आहे. प्रा. काकुस्ते यांनी देशीरवाडे गावाजवळील रस्त्याचे सुरू असलेले काम शासनाकडे पाठपुरावा करून तात्पुरते थांबविले. त्यामुळे कॅनॉलची दुरुती करत नदीचे ओव्हरफ्लोचे पाणी उजव्या कॅनॉलमध्ये वळवून काटवान भागाला आणून दिलासा देण्यात प्रयत्न केला आहे. पाण्याचा विसर्ग सुरळीत राहावा म्हणून स्वखर्चातून दोन जेसीबी लावून पाट चारीची दुरुस्ती केली. यामुळे पाणी आधी छाईलपर्यंत आणि नंतर दारखेल, नाडसे व बेहेडपर्यंत पोहोचले. या मोहिमेत पालकमंत्री जयकुमार रावल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, साक्री मंडळाध्यक्ष नैनेश भामरे यांचे त्यांना सहकार्य झाले. तसेच पराग कुवर छाईलकर, पिंटू देसले, कापडणीस, जाधव आणि पाटबंधारे खात्याचे अभियंता दुसाने यांचे देखील सहकार्य झाले. प्रा. युवराज काकुस्ते यांच्या दोन महिन्यांच्या पाठपुराव्यामुळे देशीरवाडे, उंभरे, दिघावे, प्रतापपूर, छाईल, नाडसे, दारखेल, बेहेड, विटाई, निळगव्हाण, गणेशपूर आणि कासारे या गावांमधील पिकांना जीवदान मिळणार आहे. सध्या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, राहिलेला रस्ता न खोदता धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी नियमित सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. --- घेऊ नेय. 28529 तर दुसऱ्या छायाचित्रात पाटचारीद्वारे काटवान परिसरात जाणारे पाणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com