पान २ वर घ्यावा
फोटो - गोविंद अहिरे : NSK26H28564
फोटो - NSK26H28566, NSK26H28567
केरसाणे गुप्तेश्र्वर महादेव मंदिर व महादेव पिंड
कान्हेरीच्या तीरावर गुप्तेश्वर; भक्तीने जोडले केरसाणे
------------------------------------------
कान्हेरी नदीच्या तीरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले गुप्तेश्वर महादेव मंदिर हे केरसाण्याच्या धार्मिक आणि सामाजिक एकजुटीचे केंद्र बनले आहे. महाशिवरात्र, श्रावणातील धार्मिक कार्यक्रमांसह फिरत्या नारळाच्या कार्यक्रमामुळे गावात भक्तीची परंपरा रुजली असून, दुसरीकडे डाळिंब, कांदा, कोबी, मक्याच्या पिकांनी गावाच्या शेतीची ओळखही बदलली आहे.
- गोविंद अहिरे, नरकोळ
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या केरसाने या २५०० हजार लोकवस्तीच्या गावात कान्हेरी नदीकाठी असलेल्या गुप्तेश्वर महादेव मंदिर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे. दरवर्षी महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात या मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावातील प्रत्येक ग्रामस्थ श्रीराम मंदिर हनुमान मंदिर येथील दर्शन घेतल्यानंतर नदीकाठी महादेव मंदिरात जाऊन गुप्तेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. हे मंदिर पुरातन असून पूर्वी छोटेसे होते परंतु ग्रामस्थांनी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार २०१६ मध्ये मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा सोहळाही दिमाखात झाला. ग्रामस्थ दरवर्षी महाशिवरात्रीला दिवसभर फराळ वाटप आदी धार्मिक तसेच रात्री कीर्तनाचा कार्यक्रम करतात. दुसऱ्या दिवशी गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतो. मंदिराला विद्युत रोषणाई तसेच रंग रंगोटी करण्यात आलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे कान्हेरी नदी खळखळ वाहत असल्यामुळे मंदिर परिसरात एका निसर्गरम्य ठिकाणी आल्याचा भास भाविकांना होतो. मंदिर परिसरात सभामंडप असल्यामुळे भाविकांना सोयी, सुविधा उपलब्ध आहेत.
फिरत्या नारळामुळे धार्मिक वातावरण
२०२४ मध्ये कृष्णा माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. यशोदा आक्का यांच्या नेतृत्वाखाली केरसाणे येथे फिरता नारळाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून येथे तुळशीमाळा घालणाऱ्या तरुणांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थ दरवर्षी पैठण, पंढरपूर व त्र्यंबकेश्वर येथील वारीत हिरिरीने सहभाग घेतात हे या गावाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. गावात राम मंदिर, हनुमान मंदिरासह गुप्तेश्वर महादेव मंदिर असल्यामुळे सर्वच ग्रामस्थ दर्शनाचा लाभ घेतात.
कष्टाळू गावाला धार्मिकतेची गोडी
या गावाचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे डाळिंब, कांदा, मका व कोबीसह अन्य पिकांचे उत्पन्न घेत ग्रामस्थ धार्मिकतेकडेही मोठ्या प्रमाणात वळत आहेत. पूर्वी या गावात भुईमूग व्यतिरिक्त दुसरे पीक घेतले जात नव्हते, आता सटाणा मार्केटमध्ये या गावाची ओळख आता कोबी आणि डाळिंबसह कांद्याचे उत्पादन घेणारे गाव म्हणून परिचित होत आहे.