सायबर सुरक्षा जागरूकता

सायबर सुरक्षा जागरूकता
Published on
टुडे चार ॲंकर NSK26H28565 जळगाव : सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रमात बोलताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी. व्यासपीठावर उपस्थित मान्‍यवर. ––– तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक (उपशीर्षक) कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी : सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात झेन जी पिढी तंत्रज्ञानाचा कार्यक्षमतेने वापर करीत आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत सायबर फसवणुकीचे धोकेही वाढले असून प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक व सजगतेने करणे आवश्यक आहे, असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेच्या वतीने क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायबर सुरक्षा जागरूकता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. एस. आर. कोल्हे, प्रा. आर. पी. भावसार, सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम समन्वयक डॉ. राजू आमले, सायबर सुरक्षा क्लबच्या अध्यक्षा जान्हवी सपकाळे उपस्थित होते. कुलगुरूंनी आपल्या विद्यार्थी जीवनातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवासाचा अनुभव तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाच्या या वेगवान परिवर्तनामुळे संवादाची साधने अधिक सुलभ आणि गतिमान झाली असली, त्यासोबत सायबर विश्वातील आव्हानेही वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. चौकट नाटिका, नृत्य सादरीकरण उपक्रमांतर्गत आतापर्यंत २२० विद्यार्थ्यांना सायबर स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सायबर स्वयंसेवकांच्या माध्यमातून सुमारे चार लाख नागरिकांपर्यंत पोहोचून सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा विषय अधिक प्रभावीपणे समजावा यासाठी नाटिका, नृत्य सादरीकरण, लाइव्ह डेमो आणि प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. –––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com