कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार केंद्रात गाजणार

कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार केंद्रात गाजणार
Published on
फोटो : 28586 नाशिक : काँग्रेस प्रदेश पदाधिकारी, खासदार व आमदारांशी चर्चा करताना खासदार राहुल गांधी. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार केंद्रात गाजणार --- काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींसमोर मांडली कैफियत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : नाशिककधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांतील भ्रष्टाचाराबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी खासदार राहुल गांधी यांच्याकडे कैफियत मांडली. या मुद्द्यावर केंद्रात आवाज उठविणार असल्याचे गांधी यांनी या वेळी प्रदेश नेत्यांना सांगितले. खासदार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटन सृजन या दहादिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. नाशिकमध्ये दाखल होताच त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. प्रामुख्याने शक्तिपीठ महामार्ग, कुंभमेळ्याच्या कामांसह शेतकरी प्रश्नांवर त्यांनी या वेळी नेत्यांकडून माहिती घेतली. नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांबाबत मोठ्या तक्रारी असल्याचे या वेळी नेत्यांनी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिले. या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती घेऊन अहवाल द्यावा, अशा सूचना राहुल गांधी यांनी दिल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, ‘एसआयआर’बाबतही राहुल गांधी यांनी नेत्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधत विचारणा केली. याबाबत बूथ लेव्हलवरील कामांची माहिती त्यांनी घेतली. पक्ष संघटनेत काम करताना काय अडचणी आहेत का? अशी विचारणा त्यांनी करीत एकजुटीने काम करण्याचे निर्देश या वेळी दिले. या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळातील पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, प्रणिती शिंदे, डॉ. शोभा बच्छाव, माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com