त्र्यंबकेश्वर ः जमिनी देण्यास नकार

त्र्यंबकेश्वर  ः जमिनी देण्यास नकार
Published on
मुख्य अंक पान ३ -------------- NSK26H28611 त्र्यंबकेश्वर ः येथील तहसीलदारांना साधुग्रामसाठी जमिनी न देण्याबाबत निवेदन देताना येथील शेतकरी. --------------- ३६-४ साधूग्रामसाठी शेतजमिनी देणार नाहीत त्र्यंबकच्या शेतकऱ्यांचा इशारा ः आखाड्यांच्या जागेचा वापर करावा सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.२ ः त्र्यंबकेश्वर परिसरातील शेतजमिनी साधुग्रामसाठी अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ‘कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनी देणार नाही’ असा ठाम निर्धार व्यक्त करीत शेतकऱ्यांनी तहसीलदार.... यांना निवेदन देऊन शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली. ------------- या संदर्भात शेतकरी व नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्र्यंबकेश्वर शहरात सुमारे १० आखाडे असून त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे साधुग्रामसाठी प्रथम उपलब्ध आखाड्यांच्या जागांचा तसेच शासकीय सर्वेक्षण करून वापर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येथील परिसरातील कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तात्पुरत्या व्यवस्थेसाठी सुपीक व कसदार शेतजमीन घेणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यास विरोध नसून, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या जमिनींचा बळी देण्यास विरोध असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. साधुग्रामसाठी आवश्यक जागेचे पारदर्शक सर्वेक्षण करून आखाड्यांच्या जागा, शासकीय जमीन जागांचा तुलनात्मक अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. शेतकरी संजय शिखरे, अरुण दाते, उमेश सोनवणे, मोहन कडलग, दिनेश पाटील, कल्पेश कदम, धनराज कोठुळे, दिलीप काळे, किशोर वारुणसे, आदित्य तुंगार, सुनील मिंदे, भूषण सोनवणे, कृष्णा लोणारी, रमेश दाते, दत्तात्रेय दाते, भारती दाते, रवींद्र गुळवे, दिलीप कोठुळे, संकेत देवरे, किरण चव्हाण, संजय कडलग, सागर कडलग, मनोहर कडलग, दिनकर कडलग, विशाल पुरोहित यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ------------------ १६-२मागील कुंभमेळ्यात साधुग्राम रिकामे शेतकऱ्यांनी मागील कुंभमेळ्याच्या अनुभवाकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मागील कुंभमेळ्यात अवघ्या पाच एकर जागेत साधुग्राम उभारण्यात आले होते; मात्र त्या साधुग्रामातील मोठ्या प्रमाणावरील जागा रिकाम्या होत्या. त्र्यंबकेश्वरातील आखाड्यांमध्येच अनेक साधू वास्तव्य करीत असल्याने स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर साधुग्राम उभारण्याची आवश्यकता काय, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com