फोटो -NSK26H28614
नाशिक : गोल्ब क्लब मैदानावर आयोजित प्रदर्शनात खरेदी करताना ग्राहक.
शॉपिंग एग्झिबिशनमध्ये
विविध देशातील उत्पादने
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : शहरातील ग्राहकांसाठी खरेदीची मोठी पर्वणी ठरणारा मेगा इंटरनॅशनल ट्रेड फेअर शॉपिंग एक्झिबिशन येत्या २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान येथील गोल्फ क्लब मैदानावर (त्र्यंबक रोड, सिव्हिल हॉस्पिटलसमोर ठक्कर बसस्टँड जवळ) आयोजित केले आहे. देशभरातील विविध राज्यांमधील उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल्स सहभागी झाले आहेत.
या प्रदर्शनात १८ हून अधिक राज्यांमधून आणलेली विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. यात फॅशन, ज्वेलरी, होम आणि किचन अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकोर, पॅकेज्ड फूड, बॅग्स, फुटवेअर, ॲक्सेसरीज यांसह अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. या प्रदर्शनात अनेक उत्पादनांवर मोठ्या सवलती आणि आकर्षक ऑफर्स, पूर्णपणे वातानुकूलित पार्किंगची सोय तसेच अफगाणिस्तान, कोरिया, दुबई, थायलंड या देशातील उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती गरजेच्या वस्तूंपासून फॅशन आणि जीवनशैलीशी संबंधित उत्पादनांपर्यंत विविध प्रकारची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. ४,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या पहिल्या ५० ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्यात येणार आहेत. प्रवेश फी प्रति व्यक्ती ३० रुपये असून नाशिककरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.