फोटो तीन कॉलम घ्यावा
NSK26H28684
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने आयोजित सायक्लोथॉन व वाकेथॉन स्पर्धेतील बक्षीस स्वीकारताना युनिक झुंबा गृपच्या अनिता नाथाणी, श्रीचंद अडवानी, धीरज गोविंदानी, विजय कौराणिक, नीलेश सोनवणे, धनंजय जकातदार, राजेश मोतिरामाणी, ॲड. काटकर, अनिल जोशी, भागचंद वालेचा, महेश वालेचा, रवींद्र पाटील, नरेश महाजन, संभाजी पाटील, विजय धायडे आदी.
---------------
‘सायक्लोथॉन, वाकेथॉन’
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे आयोजित सायक्लोथॉन व वाकेथॉनच्या पाचव्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मायादेवी नगरातील रोटरी भवनात ब्रँड ॲम्बेसेडर सी.ए. प्रतीक मणियार, विद्या बेंडाळे व रती महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रकल्प समन्वयक व इव्हेंट ॲडव्हायझर सुनील सुखवानी, प्रोजेक्ट चेअरमन प्रेमलता सिंग, स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन मयूर पटेल, रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश राका व मानद सचिव बिपिन काबरा उपस्थित होते. स्पर्धेत पाच किलोमीटर वॉकिंग व १० व २५ किलोमीटर सायकलिंगचे गट ठेवण्यात आले होते. विविध गटांतील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी पिंकेथॉन, जळगाव सायकलिस्ट असोसिएशन, युनिक झुम्बा ग्रुप व जळगाव रनर्स ग्रुप यांच्यासह आनंद कांकरिया, प्रतीक जीवराजानी, प्रतीक जोशी, विजय शामनानी, सुनील सुखवानी व कुमार वाणी, चंद्रकांत सतरा, विनोद बियाणी, योगेश भोळे, निखिल बियाणी, सरिता खाचणे, विनीत जोशी, विवेक काबरा, गौरव सफळे, देवेश कोठारी, मुनिरा तरवारी, गणेश झंवर, सुदाम वाणी, अमित चांदीवाल, शंतनू अग्रवाल, उमेश महाजन, विजय शामनानी, सचिन वर्मा, प्रवीण चोपडे, अमृत मित्तल, चेतन महाजन यांच्यासह युनिक झुंबा गृपच्या अनिता नाथाणी, श्रीचंद अडवानी, धीरज गोविंदानी, विजय कौराणिक, नीलेश सोनवणे, धनंजय जकातदार, राजेश मोतिरामाणी, ॲड. काटकर, अनिल जोशी, सीमा राय, विद्या जोशी, भागचंद वालेचा, महेश वालेचा, रवींद्र पाटील, नरेश महाजन, संभाजी पाटील, विजय धायडे आदींनी पुढाकार घेतला.