पान तीन
-------------------
गणेशमूर्ती स्टॉल लिलावाकडे विक्रेत्यांची पाठ
महापालिकेच्या २९८ पैकी फक्त ६५ स्टॉलला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशमूर्ती विक्री स्टॉलच्या लिलावाला विक्रेत्यांनी अतिशय अल्प प्रतिसाद दिला आहे. शहरातील ३२ ठिकाणच्या २९८ स्टॉलसाठी दोनदा लिलाव घेऊनही अवघ्या ६५ स्टॉललाच बोली लागली आहे.
महापालिकेने सहाही विभागीय कार्यालयांमध्ये लिलाव प्रक्रिया राबवली होती. २५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पहिल्या लिलावात २९८ पैकी ६० स्टॉलला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर उर्वरित २३८ स्टॉलसाठी एक सप्टेंबरला दुसरा लिलाव घेण्यात आला, त्यात फक्त ५ स्टॉलला बोली लागली. त्यामुळे एकूण २३३ स्टॉल शिल्लक राहिले आहेत. नाशिक रोड आणि सिडको वगळता अन्य चार विभागात विक्रेत्यांनी लिलावाकडे पाठ फिरवली आहे. उर्वरित २३३ स्टॉल आता सरकारी बोलीत १० टक्के वाढ करून थेट वितरित केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली.
-------------------
विभागनिहाय स्टॉल लिलावाची स्थिती
विभाग एकूण स्टॉल लिलाव झालेले शिल्लक
पूर्व १५ १ १४
पश्चिम ५५ ० ५५
पंचवटी ५८ २ ५६
सातपूर १९ ० १९
सिडको ४६ १२ ३४
नाशिकरोड १०५ ५० ५५
----------------------------------------------------------------
एकूण २९८ ६५ २३३
-------------------------------------------------------------------