२१ फुटाचा बाप्पा नंदनगरीतून मनमाडकडे रवाना!

२१ फुटाचा बाप्पा नंदनगरीतून मनमाडकडे रवाना!
Published on
(टुडे पान एक ॲन्कर करणे) फोटो : NSK26H28630 नंदुरबार: बाप्पाची मूर्ती मनमाडकडे रवाना करताना गणेश मंडळाचे कार्यकर्ते. --------- नंदनगरीतून २१ फुटी बाप्पा मनमाडकडे रवाना गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून मूर्ती दाखल सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असून, गणेश मंडळे तयारीला लागले आहेत. गणेश मूर्ती निर्मितीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार येथून गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. गणेश मूर्ती घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून गणेशभक्त नंदुरबारमध्ये दाखल होत आहेत. येथील मूर्तीकारांनी साकारलेल्या भव्य-दिव्य गणेश मूर्ती गणेश मंडळांचे कार्यकर्ते आपापल्या गावी घेऊन रवाना होत आहेत. गुरूवारी २१ फुट उंचीची आणि सुमारे तीन क्विंटल वजनाची भव्य मूर्ती एका १६ चाकी वाहनाने मनमाडकडे रवाना झाली. मनमाड येथील वैष्णवी माता मित्र मंडळाने फेब्रुवारी महिन्यात नंदुरबार शहरातील ओम कारा मंगल श्री आर्टकडे मूर्तीची नोंदणी केलेली होती. सहा महिन्यानंतर मूर्तीकार नारायण वाघ यांच्या कलाकुसरीतून साकारलेली ही मूर्ती घेण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते गुरूवारी नंदुरबारला दाखल झाले होते. मूर्ती नेताना आवश्‍यक ती काळजी घ्यावी लागत असल्याने नंदुरबार ते मनमाड अंतरासाठी किमान ३६ तासांचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळी रवाना झालेली मूर्ती शुक्रवारी सायंकाळपर्यंत मनमाडला पोहचणार आहे. मूर्तीसह वाहतुकीचा एकूण तीन लाखांपर्यंतचा खर्च मंडळाने केला आहे. बाप्पाला आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी वाहेगाव साळचे सरपंच अमोल शिंदे, गणेश मंडळाचे अध्यक्ष रवी देवरे, अमोल सोनवणे, विशाल गांगुर्डे, तुषार दासरे, प्रथमेश सांगळे, ईश्‍वर परदेशी, सागर कोल्हे, साहिल पांडे, अमोल पांडे, सारंग भालेराव, रोहीत खर्डे, विशाल दासरे आदी दाखल झाले होते. --------- कोट----- गेल्या १२ वर्षांपासून आमचे गणेशोत्सव मंडळ नंदुरबारमधून मूर्ती घेऊन जात आहे. नंदुरबारला गणेश मूर्ती आकर्षक पद्धतीने बनविल्या जातात. रंगरंगोटी, बाप्पाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि मूर्तीची गुणवत्ता मनाला प्रसन्न करून जाते. आम्ही दरवर्षी सहा महिने आधीच मूर्तीची नोंदणी करीत असतो. आम्हाला हव्या असणाऱ्या मूर्तीसाठी आम्ही फोटो सोबत आणतो आणि तशीच मूर्ती आम्हाला बनवून मिळते. मंडळाने स्थापित केलेल्या बाप्पाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. - अमोल सोनवणे, कार्यकर्ता, गणेश मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com