रूपे सुंदर सावळा गे माये...

रूपे सुंदर सावळा गे माये...
Published on
पान चार सेकंड मेन ------------------------- श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष (लोगो करणे) 28626 रास्ते वाड्यातील बालकृष्ण 28627 श्री श्री राधा मदनगोपाल 28628 मुरलीधर श्रीकृष्ण 28629 रणछोडराय श्रीकृष्ण रूपे सुंदर सावळा गे माये... जन्मसोहळा ते दहीहंडीपर्यंत विविध कार्यक्रम प्रशांत भरवीरकर : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : ‘रूपे सुंदर सावळा गे माये’ या अभंगातील सावळ्या श्रीकृष्णाची मोहिनी आजही नाशिकमध्ये अनुभवायला मिळते. या धार्मिक नगरीत रामभक्तीइतकीच कृष्णभक्तीचीही समृद्ध परंपरा रुजलेली आहे. काळाच्या पडद्याआड दडलेल्या प्राचीन देवळांपासून ते भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनलेल्या मंदिरांपर्यंत, नाशिकमध्ये श्रीकृष्णाच्या विविध रूपांची उपासना केली जाते. जन्माष्टमीच्या निमित्ताने आज, या मंदिरांमध्ये भक्तीचा जागर होणार असून, मध्यरात्रीच्या जन्मसोहळ्यापासून ते दहीहंडीपर्यंत कृष्णनामाने नाशिकचे वातावरण भारून जाणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकमधील विशेष कृष्णमंदिरांचा धावाता आढावा. --- श्री मुरलीधर मंदिर नाशिकच्या कापड बाजार म्हणजेच सराफ बाजार परिसरातील ऐतिहासिक श्री मुरलीधर मंदिर हे अंदाजे २०० वर्षे जुने आहे. त्याची स्थापना १८२५-१८२६ च्या सुमारास झाली. १८२६ साली गुंडराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचे व्यवस्थापन गुंडराज महाराजांची १४ वी पिढी सांभाळत आहे. मंदिरात अखंड पाषाणातील साडेतीन फुटांची भगवान श्रीकृष्णाची (मुरलीधर) आकर्षक मूर्ती आहे.दरवर्षी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी (श्रीकृष्ण जन्मोत्सव) अत्यंत उत्साहात दहा दिवस साजरा केला जातो. या काळात श्रीकृष्णाची विविध रूपे (उदा. गरुडावर, रथावर, झुल्यावर विराजमान कृष्ण इत्यादी) साकारली जातात. इस्कॉन मंदिर (श्री श्री राधा मदन गोपाल मंदिर) हे नाशिकमधील एक आधुनिक, अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा यांची मनमोहक मूर्ती आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) किंवा ‘हरे कृष्ण संस्था’ ही एक जागतिक पातळीवरील संघटना आहे. हे श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर हे केवळ नाशिकमधीलच नव्हे, तर जगभरातील हजारो भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. नाशिकमधील जवळजवळ २००० परिवार या संस्थेशी निगडित आहेत. पौर्णिमा स्टॉपजवळ, वृंदावन कॉलनी, हरे कृष्ण मार्ग, जनरल वैद्य नगर, द्वारका सर्कल येथे हे मंदिर आहे. श्री रणछोडराय श्रीकृष्ण पंचवटी येथील अंबिका चौकात, परशुराम पुरिया रोडवर, कपालेश्‍वर मंदिराच्या मागच्या बाजूला रणछोडराय श्रीकृष्णांचे मंदिर आहे. श्रीकृष्णाची हजारों नावे आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे रणछोडराय. रणांगण सोडून पळणारा म्हणून रणछोडराय. मूळ मंदिर गुजरात मधील डाकोर येथे आहे. त्याची ही प्रतिकृती असून याठिकाणी श्रीकृष्ण बालभावात विराजमान आहेत. हे मंदिर तीनशे वर्षापेक्षाही जुने असून श्रीकृष्ण विष्णुरूपात आहेत. चार हातात शंख, च्रक, पद्म व गदा आहेत. चार वेळा आरती तसेच चार वेळा नैवेद्य होतो. कृष्णाला तापमान मोजून प्यायला दूध दिले जाते. चटका लागू नये अथवा खूप थंडही असू नये, ही यामागील भावना आहे. मूळ वाराणसी येथील येथील असलेल्या रॉय-शर्मा घराण्याची चौथी, पाचवी पिढी येथे पूजाअर्चना करते. सध्या या मंदिरात पवन रॉय हे सेवा देतात. रास्ते वाड्यातील बालकृष्ण पेशवा घराण्यातील महत्त्वाच्या कर्त्या स्त्री श्रीमंत गोपिकाबाई पेशवे (नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी) आणि रास्ते वाडा तसेच त्यांच्या देवघराचा इतिहास अतिशय रोचक आहे. ऐतिहासिक दाखल्यांनुसार, गोपिकाबाईंच्या खासगी देवघरात आणि त्यांच्या माहेरच्या (रास्ते घराण्याच्या) देवघरात श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ मूर्ती पुजली जात असे. पंचवटी अंबिका चौकातील खांदवे सभागृहाच्या समोर रास्ते वाडा आहे. या वाड्यांच्या रचनेत पेशवाई काळातील अंतर्गत देवघरांना आणि देवडीला विशेष स्थान आहे. सागवानी लाकडातील कोरीव काम, नक्षीदार महिरपी आणि हंड्या-झुंबरांनी सजलेली ही देवघरे श्रीमंतीचे आणि सात्त्विकतेचे प्रतीक मानली जात. श्रीकृष्ण मंदिर, विवेकानंद नगर नाशिकमधील विवेकानंद नगर परिसरातील श्रीकृष्ण मंदिर हे आधुनिक वास्तुरचनेतून साकारलेले श्रद्धेचे सुंदर केंद्र आहे. मंदिरात प्रवेश करताच श्रीकृष्णाच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन मनाला शांतता देणारे ठरते. मुरलीधराचे रूप भक्तांच्या मनात प्रेम, करुणा आणि समत्वाची भावना जागवते. जन्माष्टमीच्या काळात मंदिरात विशेष सजावट, पूजा-अर्चा आणि भक्तिगीतांनी आध्यात्मिक वातावरण अधिकच भारून जाते. मुक्तीधाम मंदिर, नाशिक रोड नाशिक रोड येथील मुक्तीधाम मंदिर हे संपूर्ण संगमरवरी वास्तूसाठी प्रसिद्ध असून, धार्मिक श्रद्धा आणि कलात्मक सौंदर्याचा अनोखा संगम येथे अनुभवता येतो. विविध देवी-देवतांच्या मूर्तींसह श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन भाविकांना होते. मंदिराच्या भिंतींवर कोरलेले भगवद्गीतेचे श्लोक या संकुलाला केवळ मंदिर न ठेवता एक प्रकारचे आध्यात्मिक ज्ञानकेंद्र बनवतात. श्रीकृष्णाच्या विश्वरूपापासून योगेश्वर रूपापर्यंतचा आध्यात्मिक आशय येथे जाणवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com