नाशिकमध्ये गंडकी शिळेतील ‘कालियामर्दन’ श्रीकृष्ण

नाशिकमध्ये गंडकी शिळेतील ‘कालियामर्दन’ श्रीकृष्ण
Published on
फोटो : H28631 नाशिकमध्ये गंडकी शिळेतील ‘कालियामर्दन’ श्रीकृष्ण --- दोनशे वर्षांपूर्वीची एकमेवाद्वितीय मूर्ती; मंदिराची मात्र दुरवस्था सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : ‘भोवरी सांडुनी पाव ठेविले रे गोपाळा... नाच चिदानंदा सुख होईल सकळा’ अशा गोड शब्दांत ज्याचे वर्णन केले जाते, त्या ‘वैकुंठीच्या सुकुमारा’ अर्थात भगवान श्रीकृष्णाची सुमारे २०० वर्षे प्राचीन आणि दुर्मीळ गंडकी शिळेतील मूर्ती नाशिकमध्ये आहे. विशेष म्हणजे कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाचा हा देखावा साकारणारी ही मूर्ती एकमेवाद्वितीय मानली जाते. मात्र, धार्मिक नगरी नाशिकमध्ये असूनही या प्राचीन मंदिराकडे भाविकांचा फारसा राबता नसल्याने हे मंदिर दुर्लक्षितच राहिले आहे. नाशिकच्या रामवाडी परिसरात असलेल्या या मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या कालियामर्दनाची विलोभनीय प्रतिमा पाहायला मिळते. अखंड काळ्या पाषाणातील गंडकी शिळेपासून साकारलेल्या या मूर्तीमध्ये गोपवेशातील श्रीकृष्ण कालियानागाच्या फण्यांवर नर्तन करताना दिसतात. त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन नागकन्या असून, त्या श्रीकृष्णाला विनंती करीत असल्याचा भाव मूर्तीमध्ये साकारण्यात आला आहे. त्यामुळे एकाच शिल्पसमूहातून कालियामर्दनाची संपूर्ण कथा जिवंत झाल्याचा अनुभव येतो. ब्रह्मवैवर्तपुराणातील श्रीकृष्णाच्या विविध लीलांमध्ये कालियामर्दनाची कथा वर्णिली आहे. यमुना नदीच्या डोहात वास्तव्य करणाऱ्या कालियानागाचा श्रीकृष्णाने पराभव करून त्याला शासन केले, अशी आख्यायिका आहे. त्याच प्रसंगाचे प्रतीक म्हणून रामवाडी येथे हे मंदिर उभारण्यात आल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. पाचमजली मठाची आठवण जुन्या जाणकार नाशिककरांच्या माहितीनुसार, पूर्वी या ठिकाणी पाचमजली मठ होता. मात्र, १९७९ मध्ये आलेल्या मोठ्या पुरात हा मठ वाहून गेला. पुराच्या तडाख्यात वास्तूचे मोठे नुकसान झाले; परंतु श्रीकृष्णाची मूर्ती मात्र अबाधित राहिली. अलीकडे आलेल्या पुराच्या वेळीही संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले होते. मंदिरात चिखलाचा थर साचला; मात्र गंडकी शिळेतील अखंड पाषाणाच्या मूर्तीला कोणतीही इजा झाली नाही. अशी आहे विलोभनीय मूर्ती गंडकी शिळेतील ही मूर्ती कलात्मकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोपवेशातील श्रीकृष्ण कालियानागाच्या फण्यांवर नृत्य करताना दाखविले असून, त्यांच्या शेजारी दोन नागकन्या हात जोडून विनवणी करताना दिसतात. श्रीकृष्णाच्या बाललीलेपासून कालियामर्दनापर्यंतचा प्रसंग या शिल्परचनेत अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. मंदिरात येतात सर्प माझा जन्म याच परिसरात झाला असून, भगवान श्रीकृष्णाच्या या मूर्तीच्या अंगाखांद्यावर खेळत माझे बालपण गेले. अनेक नाशिककरांना या मंदिराची माहितीच नाही, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. अलीकडे आलेल्या पुराच्या वेळी संपूर्ण मंदिरात चिखल साचला होता. विशेष म्हणजे कालिया नागाला भेटायला आल्याप्रमाणे अनेक सापही मंदिरात आढळून आले, अशी आठवण स्थानिक नागरिक विनोद परदेशी यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com