शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक
Published on
फोटो : NSK26H28633 नंदुरबार : प्रात्यक्षिकाप्रसंगी उपस्थित शेतकरी व कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी. -------- शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक नंदुरबार, ता. ३ : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत फुले समृद्ध ग्राम श्रावणी येथे कृषी विज्ञान केंद्र व इफकोच्या समन्वयाने ड्रोनद्वारे सोयाबीन पीकात फवारणीच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन श्रावणी गावांत अवलंब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात विविध तंत्रज्ञान, पीक प्रात्यक्षिकांचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रयोग केले जात आहेत. गावातील आर्थिक स्तर उंचवण्यासाठी व उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व फवारणीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ड्रोनद्वारे सोयाबीन पीकात फवारणीच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उमेश पाटील म्हणाले की, ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर विद्राव्य खताची, फुले मायक्रोन्यूट्रिएंट, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कीटकनाशक, बुरशीनाशक व इतर कृषी निविष्ठांची फवारणी करता येते. या वेळी फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर एक समान फवारणी करता येते. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादन खर्च कमी करणे आणि कार्यक्षमता वाढविणे यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे पाटील यांनी सांगितले. ‘इफको’चे अधिकारी अमोल थेटे यांनी ड्रोनची कार्यपद्धती, फवारणीचे नियोजन, औषधांचे योग्य प्रमाण, पाण्याचे प्रमाण, हवामानाची योग्य परिस्थिती आणि फवारणीनंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. प्रवीण चौव्हाण यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com