फोटो : NSK26H28636
नंदुरबार : पथकाने जप्त केलेला गुटखा व वाहन
------------------
चिनोदा येथे तीन लाखांचा गुटखा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला दोन लाख ९४ हजार रूपयांचा पानमसाला व गुटखा चिनोदा गावातून जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटख्याची गुजरात राज्यातून चिनोदा (ता. तळोदा) गावात चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिनोदा गावात छापा टाकून कल्पेश संजय मराठे (रा. चिनोदा, ता. तळोदा) याच्या ताब्यातून दोन लाख ९४ हजार २४८ रुपये किमतीचा पानमसाला व तंबाखू व वाहतूक करण्यासाठी वापरलेला पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण सात लाख ९४ हजार २४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलिस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलिस अंमलदार निशीगंध गवळे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.