सेवा संघाचा वर्धापन दिन

सेवा संघाचा वर्धापन दिन
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... -- फोटो क्रमांक : 28638 धुळे : मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आलेल्या मान्यवरांसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, मान्यवर, आदी. -- जिजाऊंचा विज्ञानवादी विचार आत्मसात करणे गरजेचे -- प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी : मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : मराठा सेवा संघ हे जगातील एकमेव वैचारिक संघटन आहे, ज्यांच्या शीर्षस्थानी राजमाता जिजाऊ आहेत व जे महिलांचा सन्मान करते. विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारत सत्य इतिहास जनतेसमोर आणणारी ही संघटना आहे. मराठा ही जात नसून बहुजन समाजाचा एक व्यापक विचार आहे. १ सप्टेंबर १९९० ला स्थापन झालेली ही संघटना ३३ प्रबोधनात्मक कक्षांच्या माध्यमातून कार्यरत आहे. बदलत्या जगाचा वेध घेत आजच्या तरूणाईने छत्रपतींचा व राष्ट्रमाता जिजाऊंचा विज्ञानवादी विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. - मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापन दिन जिल्हा संघाच्या कार्यालयात झाला, त्यावेळी प्रा. सूर्यवंशी बोलत होते. चंद्रशेखर भदाणे अध्यक्षस्थानी होते. गटशिक्षणाधिकारी शुभम पाटील, उपशिक्षणाधिकारी रोहिणी नांद्रे, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा सचिव सुनील पवार, साहेबराव देसाई, मधु पाटील, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष बी. ए. पाटील, दिवाण पाटील, रामकृष्ण पाटील, अविनाश पवार, आर. एन. पाटील, अर्चना खैरनार, अलका बोरसे, हेमंत भडक, गुलाबराव देवरे, श्याम भदाणे, आर. आर. पाटील आदींसह समाजबांधव उपस्थित होते. - उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात गटशिक्षणाधिकारी पाटील, उपशिक्षणाधिकारी नांद्रे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त अरुणा पवार, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ संजय पवार, उपाध्यक्ष उदय तोरवणे, अजय भदाणे आणि प्रा. डॉ. प्रशांत भदाणे (पीएचडी) यांचा सत्कार झाला. केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेले सागर पाटील (मेहेरगाव), अभय ठाकरे (न्याहळोद), विलास पाटील (मोहाडी), ज्ञानेश्वर बाविस्कर (तामथरे), जगदीश बोरसे (बोरीस), अंकुश भामरे (लळींग), प्रणव पाटील (साक्री), भूषण पाटील (वाघाडी), मनोज पाटील (कुसुंबा), दर्पण देसले (देऊर) व गोविंद शिंदे (शिंदखेडा) यांचा गौरव झाला. डॉ. सुलभा कुवर व नूतन पाटील यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण नॅशनल एक्सलंट ॲवार्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार झाला. निवृत्त मुख्याध्यापक डी. टी. पाटील, नरेंद्र पाटील (बाळापूर), उपक्रमशील शिक्षिका स्मिता देसले, प्रा. भालचंद्र मोरे, अलका पाटील व प्रा. विजय देसले यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार शिवचरित्र व जिजाऊंची प्रतिमा देऊन करण्यात आला. जिल्हासचिव पवार यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com