धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 28644
प्रतापपूर (ता. साक्री) : आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणासाठी ठाकरे कुटुंबियांकडे रोपे सुपूर्द करताना सुरेश पारख. शेजारी मान्यवर, ठाकरे कुटुंबीय आदी.
--
आईच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतापपूर येथे वृक्षारोपण
--
ठाकरे परिवाराचा उपक्रम ; शेतात अस्थी विसर्जित करत लावली रोपे
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ३ : प्रतापपूर (ता. साक्री) येथील ठाकरे परिवाराने पर्यावरणाला पूरक असा सामाजिक उपक्रम राबविला. एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा जपणाऱ्या आणि सुसंस्कारित असलेल्या या परिवाराच्या ज्येष्ठ मार्गदर्शक, कासारे येथील माहेर असलेल्या कस्तुराबाई तुकाराम ठाकरे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी रविवारी (ता. ३०) साध्या पद्धतीने पार पडला. या वेळी परिवाराने आईच्या अस्थींचे नदीपात्रात विसर्जन न करता शेतात विसर्जन केले आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत झाडांच्या रूपाने आईची स्मृती कायम ठेवण्याचा व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश यातून देण्यात आला.
-
प्राचार्य बी. एस. पाटील यांनी स्थापन केलेल्या मातृ- पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने दिलीप भामरे, साक्री तालुका निसर्गमित्र समितीचे कार्याध्यक्ष सुरेश पारख यांच्या हस्ते ठाकरे परिवाराकडे रोपे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर वृक्षपूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी मधुकर ठाकरे, चुडामण ठाकरे, विजय ठाकरे, राजेंद्र ठाकरे, मुली आशाबाई दाभाडे, सुनंदाबाई भामरे, जावई संभाजी दाभाडे, भटू भामरे उपस्थित होते. तसेच, पुतणे राजेंद्र ठाकरे, विजय ठाकरे, सुरेश ठाकरे, हंसराज ठाकरे, भूषण ठाकरे, चेतन ठाकरे, डॉ. आशिष ठाकरे, डॉ. राहुल ठाकरे, योगेश ठाकरे, डॉ. शामराव ठाकरे, संभाजी ठाकरे, विश्वास ठाकरे, भिकन ठाकरे, प्रभाकर ठाकरे, विलास ठाकरे, दिलीप भामरे, डॉ. दिलीप चोरडिया, सुरेश पारख, डॉ. हेमंत पारख, संजय अहिरराव, शिरीष ठाकरे, चेतन ठाकरे, दीपक ठाकरे, संदीप ठाकरे, मयूर ठाकरे, डॉ. भावेश ठाकरे, तृप्ती पाटील, स्वरा पाटील आदींसह आप्तेष्ट उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल निसर्ग मित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, प्राचार्य बी. एम. भामरे, विलास देसले, सुरेश पारख, डॉ. अजय नांद्रे आदींनी ठाकरे परिवाराचे कौतुक केले. कल्याण अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले.