भोकरीच्या महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी

भोकरीच्या महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी
Published on
जिल्हा टुडे पान चारसाठी ------------ (बातमी आजच घ्यावी) RVR26B04974 ओंकारेश्वर (ता.रावेर) : पहाटे महाआरती करताना वनविभागाचे अधिकारी श्रीकांत काळे व उपस्थित भाविक. --- भोकरीच्या महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी सकाळ वृत्तसेवा रावेर, ता. ३ : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र ओंकारेश्वर (भोकरी) येथील महादेव मंदिरात पहाटे महारुद्र अभिषेक व महाआरती झाली. पहाटे चारला येथून श्रावण मासानिमित्त नियमित येऊन महिनाभर पूजाअर्चा करणाऱ्या पहिलवानांनी महादेवाचा गाभारा फुलांनी सजवून रुद्राभिषेक केला. पहाटे पाचला वन विभागाचे अधिकारी श्रीकांत काळे यांच्या हस्ते महाआरती झाली. १९५६ पासून रावेर येथील पहिलवान मंडळी श्रावण महिन्यात पहाटे उठून ओंकारेश्वरला जातात आणि महाअभिषेक व महाआरती करतात. सुमारे ४०० ते ५०० भाविक व तरुण यात सहभागी होतात. मुकेश महाराज व पांडू महाराज यांनी पौरोहित्य केले. ढोल, नगारे, शंख, घंटा आणि झांज यांच्या निनादात गणपती, महादेव, श्रीराम, हनुमंत, दत्तात्रय, श्री विष्णू लक्ष्मी, विठ्ठल रखुमाई, कार्तिक स्वामी या देवतांची आरती करण्यात आली. या उपक्रमाचा समारोप ९ सप्टेंबरला दुपारी बाराला महाआरतीने होणार आहे. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे संजय भोई, कैलास शिंदे, गणेश बारूदवाले, हिरामण बारी, विश्वनाथ भोई, शरद पाटील, राहुल अस्वार, विजय पाटील, यशवंत महाजन, प्रशांत महाजन, दत्तू चौधरी, मनोज पाटील संयोजन करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com