भूमिगत जलवाहिन्यांच्या नकाशे मनपाने केले प्रसिद्ध

भूमिगत जलवाहिन्यांच्या नकाशे मनपाने केले प्रसिद्ध
Published on
टुडे ४ मेन फिचर (जळगाव महापालिकेचा फोटो वापरावा) --- भूमिगत जलवाहिन्यांचे नकाशे मनपाकडून प्रसिद्ध विकसित, अविकसित क्षेत्रांतून जाणार मुख्य मलवाहिन्या; जमीनमालक, भोगवटादारांना नोटिसा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : शहरातील मलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने भूमिगत मलवाहिन्यांचे विस्तृत जाळे उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित वाहिन्यांचा मार्ग केवळ शहरातील विकसित भागांपुरता मर्यादित नसून, काही अविकसित क्षेत्रांतूनही मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी संबंधित खासगी जमिनींचाही वापर होणार असल्याने जमीनमालक व भोगवटादारांना महापालिकेकडून अधिकृतपणे सूचना देण्यात आल्या आहेत. शहराच्या विविध भागांतून सांडपाणी एकत्रित करून ते पुढील प्रक्रियेसाठी निर्धारित ठिकाणी पोहोचविण्यासाठी भूमिगत वाहिन्यांची ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी शहरात अनेक ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. प्रस्तावित मार्गानुसार काही वाहिन्या रस्ते, विकसित वसाहती तसेच अद्याप पूर्णपणे विकसित न झालेल्या भागातून जाणार आहेत. सांडपाणी शुद्धिकरण केंद्रातून हे पाणी दीपनगर वीज केंद्रासाठी त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. जमीनमालकांना नोटिसा या कामासाठी ज्या जमिनींचा किंवा मालमत्तांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा जमीनमालक आणि भोगवटादारांना महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५५ अन्वये जाहीर नोटीस बजावली आहे. वाहिन्यांचा मार्ग प्रस्तावित मलवाहिन्या कोणत्या भागातून जाणार आहेत, याची माहिती देणारे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांना आपल्या परिसरातील प्रस्तावित मार्गाची माहिती मिळणार आहे. चौकट तीन पंपिंग स्टेशनचीही उभारणी भूमिगत मलवाहिन्यांच्या जाळ्यासोबतच प्रकल्पांतर्गत तीन ग स्टेशन उभारण्यात येत आहेत. या यंत्रणेमुळे शहरातील विविध भागांतून येणाऱ्या सांडपाण्याच्या प्रवाहाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. प्रकल्पातील महत्त्वाचे टप्पे - शहरातील विविध भागांत भूमिगत मलवाहिन्या - विकसित व अविकसित क्षेत्रांचाही समावेश - प्रभावित जमिनमालकांना कलम १५५ अन्वये नोटिसा - प्रस्तावित मार्गांचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध - तीन पंपिंग स्टेशनची उभारणी सुरू कोट अमृत योजनेंतर्गत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या महत्त्वाकांशी तसेच पर्यावरणपूरक कामासाठी भूमिगत वाहिनी जाण्यासाठी संबंधित क्षेत्रातील नागरिकांनी व जमीनधारकांनी महापालिकेला सहकार्य करावे. - आदित्य जिवने, आयुक्त, जळगाव महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com