आदित्य ठाकरेंनी घेतली "जेन झी'' आंदोलकांची भेट

आदित्य ठाकरेंनी घेतली "जेन झी'' आंदोलकांची भेट
Published on
फोटो : केशव मते-28637,39 आदिवासी आंदोलनाला ‘महाविकास आघाडी’चे बळ --- आदित्य ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; उपोषणकर्त्यांची घेतली भेट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करायला या सरकारला वेळ आहे. पण, आदिवासी समाजाचे प्रश्‍न यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. युवकांनी फक्त उपोषण सोडावे, या निर्दयी सरकारच्या विरोधात आपण महाविकास आघाडीची वज्रमूठ उभी करून सर्वांत मोठा लढा उभारू, असे आश्वासन देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील ‘जेन झी’च्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यापाठोपाठ शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपोषणकर्त्या युवकांची गुरुवारी (ता. ३) ईदगाह मैदानावर भेट घेतली. उपोषणकर्त्यांजवळ जात त्यांनी या युवकांच्या मागण्या व प्रश्‍न जाणून घेतले. आदिवासी वसतिगृहातील असुविधा, सेंट्रल किचन रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट आणि गेल्या दोन वर्षांत वसतिगृहातील ५९० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार या विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा, तसेच या विभागाचे सचिव विजय वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांना तातडीने हटविण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा नैसर्गिक अधिकार आहे. या व्यतिरिक्त आपल्या मागण्या तरी काय आहेत. पण, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ‘पीए’च्या साखर कारखान्याला देण्यासाठी १८ कोटी रुपये आहेत. परंतु, पेगलवाडीसारख्या छोट्याशा गावातील रस्त्यासाठी १८ लाख रुपये देत नाही. या निर्दयी सरकारच्या विरोधात उपोषण करून आपला जीव धोक्यात घालण्याची युवकांना गरज नाही. सरकार युवकांना घाबरले आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. यासाठी शिवसेना (उबाठा) पूर्ण ताकदीने आपल्यासोबत राहील. तसेच, राहुल गांधी यांनीही आपली भेट घेतल्याने काँग्रेस आपल्याबरोबर आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलून आपण महाविकास आघाडीची ताकद उभी करू. तुम्ही उपोषण मागे घेऊन आंदोलनावर ठाम राहा, आपण या सरकारविरोधात सर्वांत मोठा लढा उभा करू, असा ठाम विश्वास त्यांनी या आंदोलकांना दिला. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात राहुल पावरा, विवेक गावित आणि लक्ष्मी जाधव या तिघांचे १२ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यातील राहुल पावरा यांची प्रकृती अचानकपणे खालावल्याने त्यांना रुग्णवाहिकेत दाखल करून तपासणी करण्यात आली. आदित्य ठाकरे येथे माध्यमांशी बोलत असतानाच ही घटना घडल्याने ठाकरेंनी तातडीने रुग्णवाहिकेत जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारणा केली. राजभवनावर मोर्चा धडकणार महाविकास आघाडीने आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही उपोषण थांबवून आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करू. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही मुंबईतील राजभवनावर मोर्चा घेऊन जाणार आहोत. त्यासाठी महाविकास आघाडीने आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशांत गावंडे यांनी आंदोलनकर्त्यांतर्फे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com