शेती-मातीची जाण असलेले

शेती-मातीची जाण असलेले
Published on
फोटो - NSK26H28710 मालेगाव शहर: येथील छत्रपती कृषी विज्ञान संकुलात माती परिक्षण लॅबोरेटरीजचे लोकार्पण समारंभास शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समवेत कृषी उद्योजक दीपक मालपुरे. ''शेती'' आणि ''माती''ची जाण असलेले ------------------------------ कृषी उद्योजक दीपक मालपुरे ग्रामीण मातीतून आलेल्या संस्कारांना व्यवसायातील प्रामाणिकपणाची जोड देत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणारे करंजगव्हाण (ता. मालेगाव) येथील दीपक मालपुरे यांनी कृषी व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकीची वेगळी वाट निर्माण केली आहे. कृषी निविष्ठांच्या व्यवसायातून उभे राहिलेले ‘आदित्य कृषी एजन्सी’चे कार्यक्षेत्र आता ग्रामविकास, शाळा विकास आणि शेतकरी मार्गदर्शनापर्यंत विस्तारले आहे. - राजेंद्र दिघे, मालेगाव शहर माळमाथा पंचक्रोशीतील चाळीसहून अधिक गावांतील शेतकऱ्यांशी असलेला दीपक मालपुरे यांचा दांडगा संपर्क ही त्यांच्या कार्याची जमेची बाजू आहे. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. त्यांचे वडील रमेश मालपुरे यांनी गावाचे सरपंच म्हणून कामकाज केले आहे. कुटुंबातून मिळालेले संस्कार आणि सामाजिक जाणिवा त्यांच्या वाटचालीत महत्त्वाच्या आहेत. कृषी व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संपर्कांचा उपयोग व्यावसायिक न करता ग्रामविकास आणि शाळा विकासासाठी करण्याची त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. विविध नामांकित कृषी कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून गावातील विकासकामे, शाळांच्या गरजा आणि शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कृषी उद्योग आणि सामाजिक विकासाची सांगड घालण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची नम्रता, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांना दिशा देण्याची वृत्तीही त्यांच्या कार्यात दिसून येते. प्रत्यक्षात कृतिशील अंमलबजावणी करून साजवहाळ गाव चंबल फर्टीलायझर्सतर्फे दत्तक घेऊन पंचतारासारखे विविध उपक्रम राबविले. कृषी विज्ञान संकुलात ३३ लाखांची माती परिक्षण लॅबोरेटरी कार्यान्वित केली. तालुक्यातील २१ जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचनालय उपलब्ध करून दिले. कृषी व्यवसायासोबतच संघटनात्मक क्षेत्रातही ते सक्रिय आहेत. महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनचे सचिव, कृषी व्यावसायिकांच्या संघटनेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी सहकार्य, समन्वय आणि समर्पणाची भूमिका कायम ठेवली आहे. व्यावसायिकांच्या अडचणी समजून मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न संघटनात्मक कार्याला बळ देणारा ठरतो. यशाच्या या प्रवासामागे आई विजया, वडील रमेश यांचे संस्कार, पत्नी स्नेहलची खंबीर साथ आहे. कुटुंबाची साथ, शेतकऱ्यांचा विश्वास, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या चौघांच्या बळावर दीपक मालपुरे यांनी आपली वाटचाल अधिक व्यापक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com