धुळे : टुडे पान ३ साठी... अवतीभवती
--
संतसेना महाराजांच्या
पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
धुळे : नाभिक समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत शिरोमणी संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता. ८) शहरात पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेआठला केशव गार्डन (मनोहार टॉकीज) येथून या मिरवणुकीचा प्रारंभ होईल. आग्रारोड मार्गे मोठा पूल, एकविरा माता मंदिर जवळील कानूश्री मंगल कार्यालयात मिरवणुकीची सांगता होईल. तेथे संतसेना महाराजांची आरती व दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या सोहळ्यात शहरातील सर्व नाभिक समाज बांधव, महिला, युवक, विविध संघटना, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरातील सर्व व्यावसायिक व सलून दुकानदार बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत, असे आवाहन शहर नाभिक दुकानदार संघटना व शहर नाभिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
--
बाफना शाळेत
पालक मेळावा
धुळे : श्रीमती सुंदरबाई छगनलाल बाफना प्रायमरी स्कूलमध्ये नुकताच शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. संस्था अध्यक्षा हिराताई खंदळकर, संस्था उपाध्यक्ष व बालमंदिर अध्यक्षा आरती महाले, सहसचिव चंपावती अग्रवाल, मुख्याध्यापिका प्रतिभा तोरवणे, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष सोनवणे, माजी अध्यक्ष सुमन महाले, सुलोचना अग्रवाल, विजया झेंडे आदींसह शिक्षक, पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका तोरवणे यांनी प्रास्ताविक केले. अरविंद वसावे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. आशा शिंदे यांनी जमा-खर्च सादर केला. शिक्षिका मनीषा कोठावदे, सचिन जयस्वाल व अनिता पाटील यांनी शाळेच्या विविध कामकाजाची माहिती पालकांना दिली. अरविंद वसावे यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली देवरे यांनी आभार मानले.
--
शनिवारी जिल्हास्तरीय
तलवारबाजी निवड चाचणी
धुळे : जिल्हा तलवारबाजी असोसिएशन व कै. सौ. चंद्रभागाबाई भिका कंखरे संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २१ वर्षांखालील मुला-मुलींची ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद निवड चाचणी शनिवारी (ता. ५) सकाळी दहाला जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये होणार आहे. यात निवड झालेले खेळाडू ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. खेळाडूंनी विशाल पवार, विशाल राव, अनिल बाडिले किंवा ओम धनगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सतीश महाले व सचिव कैलास कंखरे यांनी केले आहे.