धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 28674 - पंकज बाविस्कर, 28675 - मयूर पाटील.
--
दोन तरुण सैन्य
दलात अधिकारी
--
धुळे आणि अमळनेरसाठी गौरवास्पद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : नंदाणे (ता. धुळे) येथील पंकज बाविस्कर आणि खवशी (ता. अमळनेर) येथील मयुर पाटील (आजोळ-कापडणे) या दोन सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील युवकांची भारतीय सैन्य दलात अधिकारी पदासाठी निवड झाली. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पंकज बाविस्कर तर गया (बिहार) येथे मयुर पाटील यांचे वर्षभराचे कठोर प्रशिक्षण होईल. त्यानंतर त्यांची सैन्य दलात अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल.
-
या यशाबद्दल अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत व सध्या रजेवर आलेल्या लेफ्टनंट सलोनी बोरसे यांच्या निवासस्थानी युवकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कर्नल (रिटा.) उत्तम पाटील, मिनाक्षी पाटील, लेफ्टनंट बोरसे, निवृत्त नाईक कैलास माळी, सुनीता माळी, अनिता पाटील, हिरालाल पाटील, कमला जाधव, सुरेश जाधव, मनिषा कोठवदे, सतीश कोठवदे, रिटा बोरसे, सुकलाल बोरसे, विद्या खंडेलवाल, अनिल खंडेलवाल, रिशीका पाटील, डॉली बोरसे व भूमी खंडेलवाल उपस्थित होते. सत्काराप्रसंगी पालक रंजना बाविस्कर, राजेंद्र बाविस्कर, सुनीता पाटील व सूर्यकांत पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कर्नल (रिटा.) पाटील व लेफ्टनंट बोरसे यांनी परिसरातील सैन्य अधिकारी बनू इच्छिणाऱ्या युवक- युवतींना मोफत मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल, ज्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.