एसएसबीटी अभियांत्रिकीत ‘इंडक्शन’

एसएसबीटी अभियांत्रिकीत ‘इंडक्शन’
Published on
(बातमी आवश्‍यक) NSK26H28685 जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकीत विशाल सोनकुळ यांचा सत्कार करताना मान्यवर. पर्यावरण संवर्धनातून राष्ट्रनिर्मितीला हातभार द्या सोनकुळ : एसएसबीटी अभियांत्रिकीत ‘इंडक्शन’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वाढता वापर, जलस्रोतांचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘राष्ट्रसेवा आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये मैत्रीची भूमिका’ या भावनेतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते विशाल सोनकुळ यांनी केले. श्रम साधना ट्रस्ट संचालित एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रमात पर्यावरणविषयक जनजागृती : राष्ट्रसेवा, राष्ट्रनिर्मितीमध्ये मैत्रीची भूमिका’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीने विशाल सोनकुळ यांचे स्वागत केले. यावेळी विभागातील प्रा. प्रवीण पाटील, समन्वयक मीरा कुलकर्णी, धनश्री तायडे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. प्रीती शर्मा यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. प्रवीण पाटील यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सिद्धी नेवे, अंजली जैन, उन्नती पाटील, सचिन भालेराव आणि तनुजा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक आणि उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com