राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
Published on
फोटो : NSK26H28693 कोरीट : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी. ------------------- कोरीटला विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आयोजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार योग्य वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार मिळावे, यासाठी तालुक्यातील कोरीट येथील के. डी. गावीत शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता दहिवेलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार मराठे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. फार्मासिस्ट ममता पावरा, एएनएम वर्षा जोशी यांनी आरोग्य तपासणीच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. विद्यार्थ्यांनाआरोग्याची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छता, संतुलित व पौष्टिक आहार, स्वच्छ पाणी आणि आरोग्यविषयक समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी विद्यार्थीच शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध शालेय उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊ शकतो. त्यामुळे शालेय स्तरावर आरोग्य तपासणी उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आरोग्य तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांनी डॉक्टरांकडून विविध आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, राकेश पाटील, व्ही. एस. पाटील, विश्वासराव शिरसाठ, रवींद्र सोनवणे, सुनीता निकम, चारुशीला निकम, मीनाक्षी पाटील, ज्योत्स्ना देवरे, जयश्री देवरे, निता साळुंखे, प्रा. भरत चव्हाण, प्रा. नयना पवार, प्रा. सुनील खाडे, प्रा. स्वाती बारी, प्रा. प्रशांत बोरसे, सुनंदा पाटील, कौशिक बाविस्कर, किशोर भिलावे उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com