धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
मिल परिसरात
आज कार्यक्रम
धुळे : श्री द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त मिल परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीतील श्री द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण मंदिर येथे शुक्रवारी (ता. ४) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात सायंकाळी सातपासून जन्मउत्सव दर्शन, श्रीकृष्णाचा अभिषेक, तसेच पालखी आणि विविध धार्मिक अनुष्ठान पार पडणार आहेत. जन्मोत्सवाच्या या देखाव्याचा आणि श्रीबालकृष्ण भगवान दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानने केले आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आरती होईल. दि आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भजन संध्येचा कार्यक्रम होईल, असे श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र शेलार, नगरसेवक अमोल मासुळे यांनी सांगितले.
--
धुळ्यात आज
भजन संध्या
धुळे : श्री द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त येथील मुलचंद सदाराम गिंदोडिया व परिवारातर्फे शुक्रवारी (ता. ४) रात्री आठपासून भजन संध्येचा कार्यक्रम होणार आहे. मालेगावचे कृष्णा दायमा भजन सादर करतील. हा कार्यक्रम शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील श्री राधाकृष्ण मंदिर येथे होईल. भाविकांना उपस्थितीचे आवाहन गिंदोडिया परिवाराने केले आहे.
--
जीटीपी स्टॉपला
उद्या दहिहंडी
धुळे : श्री द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त येथील देवपूरमधील जीटीपी स्टॉपला शनिवारी (ता. ५) सायंकाळी सातला दहिहंडी उत्सव होणार आहे, अशी माहिती आयोजक तेजस सोनवणे यांनी दिली. तेजयोग फाउंडेशन, साई सरकार ग्रुपतर्फे होणाऱ्या या उत्सवात दहिहंडी फोडणाऱ्यास अडीच लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या फाउंडेशनचा हा उत्सव आकर्षण ठरतो.
--
गौणखनिज उत्थनन;
ग्रामस्थांचे आंदोलन
धुळे : तालुक्यातील नरव्हाळ येथील गट क्र.२०३/१ मधील श्री भवानी माता मंदिर असलेल्या टेकडीवर गौण खनिजाच्या उत्खननाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गौणखनिजाची चोरी होत असल्याचा आरोप करत संबंधित कंपनी, ठेकेदार तसेच यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी क्युमाईन क्लब येथे धरणे आंदोलन केले.
--