ॲंकर
लोगो : शिक्षक दिन विशेष
NSK26H28729
जळगाव : कृतीयुक्त अध्यापन करताना शिक्षिका गौरी सपकाळे.
–––
NSK26H28731 (गौरी सपकाळे)
–––
खेळता-खेळता शिक्षणाचा आनंद
(उपशीर्षक)
पिंपळकोठा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कृतियुक्त धडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता खेळ, कृती आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शिकविण्याचा अनोखा उपक्रम पिंपळकोठा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने सुरू केला आहे. गंमतीदार आणि कृतीयुक्त पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत असून, अवघड संकल्पनाही सहजपणे समजत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओंद्वारे इतर शिक्षक देखील या कृतीचा अवलंब करत आहेत.
पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका गौरी शालिग्राम सपकाळे विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिक्षणाचे धडे देत आहेत. नऊ वर्षांपासून पिंपळकोठा शाळेवर कार्यरत असून येथे आपले उपक्रम अधिक प्रभावी केले.
गणिताची भीती झाली कमी
वर्गातील अध्यापन अधिक रंजक करण्यासाठी विविध ट्रीकचा वापर केला जात आहे. गणितातील उदाहरणे अंकखेळातून, भाषेचे धडे गोष्टी व संवादातून, तर विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृती आणि प्रयोगांतून समजावून सांगतात. तर अंक, पाढे, बेरीज-वजाबाकी यांसाठी विविध खेळ आणि उपक्रम घेतले जात आहेत.
खेळ, प्रयोग आणि उपक्रमांतून शिक्षण
खेळातून विद्यार्थ्यांना गगित शिकविणे, तसेच वेगवेगळे प्रयोग व उपक्रमातून जसे एका शब्दापासून अनेक शब्द कसे तयार होतात. कृतियुक्त म्हणी, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ लक्षात ठेवण्याची ट्रीक योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना समजाविली. सर्व उपक्रम राबविण्यासाठी सोशल मीडियाचा देखील वापर करतात. तर आठवड्यात आनंददायी शनिवार या उपक्रमात विना दप्तर असल्याने गप्पांचा तास हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये बसून वेगवेगळ्या गोष्टी सांगतात.
इन्फो
इतर शिक्षकही करतात अवलंब
दरम्यान गौरी सपकाळे प्रत्येक उपक्रमाचा व्हिडिओ करतात. या उपक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून घेण्यावर भर देतात. विशेष म्हणजे केलेले व्हिडिओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकत असल्याने या व्हिडिओद्वारे इतर शिक्षक देखील मुलांना शिकविण्यासाठी कृतीचा अवलंब करत आहेत.
कोट
मोबाईलवर पाहून विद्यार्थ्यांसाठी वेगळे काय करता येईल, हा प्रयत्न असून मुले पटकन कसे शिकतील, यासाठी प्रयत्न आहे.
- गौरी सपकाळे, शिक्षिका, जि. प. शाळा, पिंपळकोठा