(बातमी आवश्यक)
---
(सकाळ-एनआईचा लोगो वापरावा)
---
शाडूच्या गणेशमूर्ती महा-कार्यशाळेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
२,२४५ विद्यार्थ्यांची नोंदणी; ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.४ : ‘सकाळ-एनआयई’ आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३ हजार विद्यार्थ्यांच्या भव्य शाडू माती गणेशमूर्ती महा-कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी आतापर्यंत २ हजार २४५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, लवकरच ३ हजार विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
रविवारी (ता. ६) सकाळी ८ ते ११ या वेळेत ला. ना. हायस्कूल, स्टेट बँकेसमोर ही भव्य पर्यावरणपूरक कार्यशाळा होणार आहे. एकाच ठिकाणी हजारो विद्यार्थी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. या उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग
शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, जळगाव शहरासह परिसरातील विविध शाळांमधून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरी नेऊन गणेशोत्सवात तिची प्रतिष्ठापना करावी आणि त्यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
विविध संस्थांचे सहकार्य
या महा-कार्यशाळेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सावरिया फूड पार्क, सुरेश अँड कंपनी, नोबल नॅशनल स्कूल, पाळधी, ऑक्झिमाईन ड्रिंकिंग वॉटर, व्हेवज क्लासेस, प्रफुल्ल क्लासेस, पद्मपाणी फाउंडेशन, लीडस्केम इंडिया लिमिटेड, एसडी इव्हेंट्स, एसडी फाउंडेशन (श्रेयस दिनेश) आणि सॅटर्डे क्लब जळगाव २.० यांचे सहकार्य लाभत आहे.
चौकट
नावनोंदणीसाठी संपर्क
कार्यक्रमाचे नियोजन आणि मर्यादित जागा लक्षात घेता इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नावनोंदणी करून आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख दिनेश थोरात (९८५०६०३५९०), सकाळ-एनआयई समन्वयक आशुतोष पाटील (८६६९७११०४९) यांच्याशी संपर्क साधावा.