जिल्ह्यात केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ, शेतकरी त्रस्त

जिल्ह्यात केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ, शेतकरी त्रस्त
Published on
नंदुरबार जिल्ह्यात केबल चोरीचे सत्र; शेतकरी त्रस्त भादे, कर्जोत, निंभोरे, उजळोद शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; हजारो रुपयांच्या केबल लंपास सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : जिल्ह्यातील शेतशिवारांमध्ये विद्युत व सबमर्सिबल पंपांच्या केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटे केबल वायर लंपास करीत आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, पिकांना पाणी देण्याची यंत्रणाही विस्कळीत होत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतशिवारातील गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. भादे शिवारात आठ शेतकऱ्यांना फटका शहादा तालुक्यातील भादे शिवारात आठ शेतकऱ्यांच्या शेतातून केबल वायर चोरीस गेली. भगवान रतन पाटील, संजय सखाराम पाटील, अंबालाल रामदास पाटील, गिरीष माधव पाटील, मनोज घनश्याम पाटील, विश्वास रतन पाटील, शरदचंद्र अशोक पाटील व तुकाराम जाधव पाटील (सर्व रा. भादे) यांच्या शेतातून प्रत्येकी सुमारे ७०० रुपये किमतीची, एकूण ५ हजार ६०० रुपये किमतीची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर देसले करीत आहेत. कर्जोतमध्ये दोन घटनांत केबल चोरी कर्जोत शिवारातही केबल चोरीच्या दोन घटना घडल्या. प्रविण शिवाजीराव शेलार, संजय लक्ष्मण शिंदे, भगवान मका कोळी, उदयसिंग सरदारसिंग गिरासे व संजय माणिकराव शेलार या पाच शेतकऱ्यांच्या शेतातून १३ हजार ९४९ रुपये किमतीची सबमर्सिबल केबल वायर चोरीस गेली. याच शिवारातील राजेंद्र पुरुषोत्तम पाटील, मन्साराम त्र्यंबक सोनवणे, प्रदीप रमेश हसुळे, तुषार बाळासाहेब शिंदे, दीपक रूपसिंग गिरासे व पुंडलिक शिवाजीराव शेलार यांच्या शेतातूनही अज्ञात चोरट्यांनी ९ हजार ८०० रुपये किमतीची केबल वायर लंपास केली. निंभोरेत सहा शेतकऱ्यांचे नुकसान निंभोरे शिवारातील सहा शेतकऱ्यांच्या शेतातून ११ हजार ३९८ रुपये किमतीची केबल वायर चोरीस गेली. रंगराव देविदास मराठे यांच्या शेतातून ३ हजार २७८ रुपये किमतीची केबल वायर चोरीला गेली. तसेच कांतीलाल पुंडलिक मराठे, गणेश निंबाजी मराठे, देवेंद्र आनंदा मराठे, नंदलाल विठ्ठल मराठे व बालू भिवसन बेलदार यांच्या शेतातूनही केबल वायर चोरीस गेली. उजळोद शिवारात आठ शेतकरी बाधित उजळोद शिवारातही चोरट्यांनी आठ शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायरवर डल्ला मारला. प्रदीप दंगल पाटील, रामकृष्ण भगवान पाटील, भरत सुकलाल पाटील, भूषण भरत पाटील, गुणवंत गंगाराम पाटील, पुंडलिक लोटन पाटील व भटू सीताराम पाटील यांच्या शेतातून एकूण १५ हजार ६०० रुपये किमतीची केबल वायर चोरीस गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com