रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ जाहीर

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ जाहीर
Published on
(पान १ ला ॲंकर) फोटो : NSK26H28782 (राजेंद्रकुमार गावित) फोटो : NSK26H28783 (डॉ. वसंत पाटील) ----------------------- रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे पुरस्कार जाहीर राजेंद्रकुमार गावित, डॉ. वसंत पाटील यांना उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्कार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : ‘रोटरी क्लब ऑफ नंदनगरी’तर्फे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट संस्था व संस्था चालक पुरस्कार आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद (ता. जि. नंदुरबार) या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित आणि सरस्वती सेवा संस्था, शहादा या संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंत पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांनी दिली. उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, उत्कृष्ट कर्मचारी घनश्याम गवळे, निवृत्त केंद्रप्रमुख ललिता भामरे यांची निवड झाली. शिक्षक पुरस्कारासाठी सीमा मोडक (डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार), प्रणिता अतुल चौधरी (वर्धमान पब्लिक स्कूल, अक्कलकुवा), कुंदन सुभाष पाटील (साधना विद्यालय शनिमांडळ), दिनेश खरात (विद्या विकास मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय अक्कलकुवा), फादर टेनी डिसुझा (चावरा स्कूल, नंदुरबार), प्रा. डॉ. लेफ्ट. विजय चौधरी (जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार), शमुवेल देवधान वसावे (जीवन विकास विद्यालय, बोरचक, ता. नवापूर), सैय्यद इकराम अली (सिटी हायस्कूल, नंदुरबार), किशोर यशवंत पाटील (जि. प. आदर्श केंद्र शाळा, कोठली खुर्दे, ता. नंदुरबार), अमोल शिंदे (जि. प. केंद्र शाळा, चिखली, ता. शहादा) आणि राहुल पंडित इंदवे (अनुदानित आदर्श आश्रमशाळा, दापूर, ता. नवापूर), संजय कमलसिंग रघुवंशी (नवजीवन विद्यालय, वाघाळे, ता. नंदुरबार), नितीन ज्ञानेश्वर पाटील (एकलव्य विद्यालय, नंदुरबार) यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विठ्ठल बोराणे (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार), तर दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य पुरस्कार भरत जिजाबराव पाटील यांना जाहीर झाला आहे. निवड समितीमध्ये अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह डॉ. विशाल चौधरी, रमाकांत पाटील, निलेश तंवर, आकाश बेदमुथा आणि सचिव महेश रघुवंशी यांचा समावेश होता. लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. या वेळी रोटरी क्लबचे सचिव महेश रघुवंशी, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली, नागसेन पेंढारकर, किरण दाभाडे, डी. पी. महाले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com