फोटो : H28734
नाशिक : जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेता ठरलेला मविप्रच्या होरायझन ॲकॅडमीचा संघ.
-------------------
विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी
होरायझन ॲकॅडमीची निवड
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : गंगापूर रोडवरील मविप्रच्या होरायझन ॲकॅडमी स्कूल (आयसीएसई)"च्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने शहरात झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या विजयासह संघाची जळगाव येथे होणाऱ्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या उपांत्यफेरीत होरायझन ॲकॅडमीच्या मुलींनी आर. जे. चव्हाण संघाचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उत्कृष्ट बचाव, आक्रमक खेळ, वेगवान प्रतिसाद आणि संघातील उत्तम समन्वयाच्या जोरावर त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आपल्या दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करत टी. जे. चव्हाण संघावर मात करून विजेतेपदाचे चषक जिंकले. या कामगिरीमुळे होरायझन ॲकॅडमीचा संघ विभागीयस्तरावर नाशिकचे प्रतिनिधित्व करणार असून, जळगाव येथे होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेत विभागातील उत्कृष्ट संघांशी सामना करेल. संघाला जगदीश गोळदे, सचिन पगारे आणि राहुल फडोळ यांनी मार्गदर्शन केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी संघाचे अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संघात स्वरा गायकवाड, आरोही वराडे, ओवी व्यवहारे, शरन्या जाधव, आरोही ठाकरे, ईश्वरी वाघ, काव्या देवरे, संजना धारे, सिद्धी सिधिगिरे, आराध्या पगार आणि अदिश्री कायंडे यांचा समावेश होता.