‘मनपाच्या तिजोरीला ब्रेक; मक्तेदार लागले खड्डे बुजवायला

‘मनपाच्या तिजोरीला ब्रेक; मक्तेदार लागले खड्डे बुजवायला
Published on
NSK26H28755 जळगाव : प्रभाग १३ मधील दोषदायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यातील खड्डे दुरुस्तीचे काम मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेताना नगरसेविका वैशाली पाटील. --- मनपाच्या तिजोरीला ‘ब्रेक’; मक्तेदाराकडूनच रस्ते दुरुस्ती नगरसेविका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; प्रभाग १३ मधील कामांना सुरुवात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत बांधण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागल्याने त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोष दायित्व कालावधी अद्याप सुरू असतानाही खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्यास नगरसेविका वैशाली पाटील यांनी विरोध दर्शविला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित मक्तेदारालाच स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग १३ मधील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आता सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानातून शहरातील विविध रस्त्यांची कामे ‘श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर, जळगाव’ या मक्तेदारामार्फत करून घेतली होती. मात्र, काम पूर्ण होऊन काही काळ लोटत नाही तोच अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण उखडणे, खड्डे पडणे आणि रस्त्यांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे हे रस्ते अद्याप दोष दायित्व कालावधीत असल्याने त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी मक्तेदाराचीच असल्याचा मुद्दा नगरसेविका पाटील यांनी उपस्थित केला. यात ‘मक्तेदाराच्या निष्काळजीपणाचा आर्थिक भार महापालिकेवर टाकता येणार नाही,’ अशी भूमिका घेत त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर बांधकाम विभागाने दुरुस्तीची जबाबदारी मक्तेदारावर निश्चित केली. कालवधीतील कामे करावीत ही कारवाई केवळ प्रभाग १३ पुरती मर्यादित न ठेवता दोष दायित्व कालावधीत असलेल्या शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती संबंधित मक्तेदारांकडून खड्डे व रस्ता दुरूस्तीचे काम करून घ्यावी, अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली आहे. प्रशासनाने पाच प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचे निर्देश दिले असून, काव्यरत्नावली चौक-राजमाता जिजाऊ चौक, डिमार्ट-गिरणा पाण्याची टाकी-लक्ष्मी संकुल, राष्ट्रीय महामार्ग-कोल्हे नगर १०० फूट रोड, संभाजी नगर स्टॉप-मोहाडी रोड तसेच मोहाडी रोड-संत गाडगेबाबा चौक-पठाण बाबा दर्गा या मार्गांचा त्यात समावेश आहे. चौकट रस्त्यांचा अहवाल मागविला याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात केलेल्या सर्व रस्त्यांची कामे, पूर्णत्वाच्या तारखा आणि दोष दायित्व कालावधीची माहिती असलेला सविस्तर अहवाल महापालिकेकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com