धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H28730
धुळे : पंचशिल वसतिगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी विद्यार्थ्यांसह डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, निरंजन भतवाल, संजय सरदार व इतर पदाधिकारी.
---
‘पंचशिल’च्या विद्यार्थ्यांना
मी धुळेकरतर्फे वह्या वाटप
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : ‘मी धुळेकर’ संघटनेतर्फे शहरातील साक्री रोड परिसरातील पंचशील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा काही प्रमाणात पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने डॉ. कृष्णमोहन सैंदाणे तसेच दैनिक सकाळचे उपसंपादक धनंजय सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, रंगसंच, पेन, पेन्सिल, कंपासपेटी, चॉकलेट व खाऊ वाटप करण्यात आले. मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल उपस्थित होते. या वेळी डॉ. सैंदाणे यांनी विद्यार्थ्यांना हाडांच्या मजबुतीसाठी व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच इजा झाल्यास कोणते प्राथमिक उपचार करावेत याचे प्रात्यक्षिकही करून मार्गदर्शन केले. श्री. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व, अभ्यासाची योग्य पद्धत याबाबत मार्गदर्शन केले. वसतिगृहाचे निरीक्षक संजय सरदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच, मी धुळेकर संघटना तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या वेळी ‘मी धुळेकर’ संघटनेचे छोटू पोतदार, दिनेश वाघ, फरदीन शेख व आफ्रिदी शेख यांच्यासह वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
---