NSK26H28779
जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दहीहंडी उत्सवात पाच थरांचा मनोरा करत हंडी फोडताना विद्यार्थिनी.
------
पाच थरांचा मानवी मनोरा रचत
विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
उपशीर्षक
गोदावारी नर्सिंगमध्ये पाचव्या प्रयत्नात यश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाच थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. हंडी फोडण्यासाठी चार वेळा प्रयत्न केल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यश आले.
कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्या विशाखा गणविर, उपप्राचार्य जेसिंथ ढाया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. केतकी पाटील नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बाविस्कर, परिचारीका अधीक्षक संकेत पाटील आदी उपस्थित होते. विशाखा वाघ यांनी प्रास्ताविक केले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान गोपाळ कृष्णाचे पूजन व पाळणा करण्यात आला. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींच्या पथकांनी मानवी मनोरा रचण्यास सुरवात केली. चार प्रयत्नांनंतर पाचव्या प्रयत्नात पाच थरांचा मनोरा रचून विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडली.
--------