NSK26H28793
रावेर : फैजपूर ते सावदादरम्यान महामार्गालगत समांतर रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, पदाधिकारी व अधिकारी.
-----
अंकलेश्वर- तळोदा महामार्गालगत समांतर रस्त्यांचा विकास
उपशीर्षक
फैजपूर, सावद्यात भूमिपूजन; रक्षा खडसेंच्या हस्ते ७१ कोटींच्या कामांना प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : अंकलेश्वर- तळोदा महामार्गाच्या चौपदरीकरणाला फैजपूर, सावदा शहरातील समांतर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. ४) केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले. फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभही झाला. याद्वारे रावेर लोकसभा मतदारसंघात सुमारे ७१ कोटींच्या कामांना सुरुवात झाली.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
सावदा, फैजपुरात समांतर
रस्त्यांचा होणार विकास
बऱ्हाणपूर- अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शहरांतर्गत विद्यमान मुख्य मार्गांवरील वाहतूक, स्थानिक नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आणि व्यापारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्गाला समांतर शहरांतर्गत मार्ग विकसित करण्यासाठी श्रीमती खडसे यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन, रावेर, यावल, फैजपूर व सावदा येथील भाजपचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
या कामांचा समावेश
यावल शहरांतर्गत महामार्गाला समांतर रस्ता : लांबी- ६.५ किलोमीटर, खर्च- १४.५९ कोटी
फैजपूर-सावदा शहरांतर्गत महामार्गाला समांतर रस्ता : लांबी- १४.२३ किलोमीटर, खर्च- २७.९९ कोटी
रावेर शहर ते महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमा समांतर मार्ग : लांबी- ११.१० किलोमीटर, खर्च- २२.१० कोटी
या तिन्ही कामांसाठी एकूण ६४.६८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. फैजपूर (यावल) येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सहा कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.