विसपूर आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

विसपूर आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू
Published on
मेन फोटो : H28771, H28769,२८८११ -- संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या आश्रमशाळेत विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण; आदिवासी विकास विभागाकडून तिघांचे निलंबन सकाळ वृत्तसेवा नाशिक/ जुने नाशिक, ता. ३ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांवरून राज्यात आंदोलनांचे रान पेटलेले असताना विसापूर शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी ओंकार सूर्यवंशी हिचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास पालकांनी व युवकांनी नकार दिला. मृतदेह थेट आदिवासी आयुक्तालयात घेऊन जाण्याची तयारी त्यांनी केल्यामुळे घाबरलेल्या प्रशासनाने त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालय गाठत पालकांची समजूत काढली. तसेच तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून मुलींच्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विसापूर आश्रमशाळा येते. येथील विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी हिला बुधवारी (ता.२) शाळेत असताना ताप आला म्हणून शाळेतच प्राथमिक उपचार करण्यात आले. तरी ताप पूर्णतः बरा झाला नाही आणि गुरुवारी पुन्हा त्रास झाला म्हणून मोकभगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील उपचारांनंतर तिची प्रकृती काहीशी ठिक झाली म्हणून सृष्टी शाळेत आली. मात्र, रात्री ८ ते ९ च्या दरम्यान तिला पुन्हा ताप आला आणि रात्री साडेबाराच्या सुमारास उलट्या झाल्यामुळे तिची प्रकृती अधिक खालावली. मध्यरात्री दोन ते सव्वा दोनच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. शवविच्छेदनासाठी सृष्टीचा मृतदेह सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी व आदिवासी युवकांनी रुग्णालयात तोबा गर्दी केली. सृष्टीच्या मृत्यूस कारणीभूत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वेळीच कारवाई केली नाही तर आयुक्तालयात तिचा मृतदेह घेऊन जावू, असा इशारा या युवकांनी दिला. त्यामुळे घाबरलेल्या आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन पालकांची भेट घेतली. त्यांनी तातडीने कारवाई आदेश देत शिक्षण विस्तार अधिकारी भगवान वसंत निकम, स्त्री अधीक्षिका स्मिता प्रल्हाद गायकवाड आणि शाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ पवार यांच्या निलंबनाचे आदेश अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी काढले आहेत. शासनाच्या वतीने सृष्टीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत केली जाणार आहे. …चौकट सेंट्रल किचनचा बळी; पालकांचा आरोप सृष्टीने सेंट्रल किचनचे अन्न सेवन केल्यामुळे तिला हा त्रास झाल्याचा आरोप जिल्हा शासकीय रुग्णालयात उपस्थित पालकांनी केला. त्यामुळे सेंट्रल किचन त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. --कोट सृष्टीचा मृत्यू शाळेत झाला किंवा रुग्णालयात यापेक्षा आम्ही तिच्या मृत्यूची कारणे सखोलपणे शोधत आहोत. सेंट्रल किचनची नोंदवही तपासली जाईल. तिला किती प्रमाणात ताप आला, कुठले उपचार झाले व मृत्यूचे नेमके कारण काय हे लवकरच समजेल. विद्यार्थ्याचा मृत्यू कसा टाळता येईल, यासाठी ठोस उपाय योजना करण्याच्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. -लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com