कसमादे खासगी बाजार

कसमादे खासगी बाजार
Published on
फोटो कसमादे बाजार प्रवेशद्वार -NSK26H28803 सुरेश पवार-NSK26H28804 गणेश पवार-NSK26H28805 लेखक अरूणकुमार भामरे - NSK26H28806 शेतकरी हिताचे विश्वासू केंद्र : खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार शेतमालाला योग्य भाव, व्यवहारात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक या त्रिसूत्रीवर उभी राहिलेली ढोलबारे येथील खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार अल्पावधीतच शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. आधुनिक सुविधा, शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि शेतकरीहिताला प्राधान्य देणाऱ्या व्यवस्थापनामुळे ढोलबारे येथील ही बाजारपेठ कृषी विपणन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करीत आहे. - अरुणकुमार भामरे, अंतापूर कृषी क्षेत्रातील निष्णात तज्ज्ञ आणि संस्थापक, सभापती सुरेश नाना पवार यांच्या कल्पकतेतून आणि तळमळीतून या आधुनिक बाजार समितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. कृषी, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव हे कामकाजातील पारदर्शकता, अचूक नियोजन आणि सेवाभावी वृत्ती जपत व्यवस्थापन सांभाळत आहेत. तसेच कृषी उद्योगाचे सखोल जाणकार असलेले सचिव गणेश पवार यांच्या कुशल प्रशासनामुळे बाजाराची घोडदौड सुरू आहे. या तिन्ही नेतृत्वांच्या सचोटी आणि दूरदृष्टीमुळे बाजार समिती प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा भौगोलिक सुलभता व वाहतूक: बाजार महामार्गालगत असल्याने शेतमालाची वाहतूक अत्यंत सुलभ व जलद होते. शेतमालाची विक्री होताच शेतकऱ्यांना विनाविलंब रोख रक्कम अदा केली जाते. दूरवरून येणाऱ्या बळीराजासाठी स्वतंत्र ''शेतकरी निवास'', स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, येथे येणाऱ्यची गैरसोय होऊ नये या हेतूने चहा-नाश्त्यासाठी स्वतंत्र अस्सल गावरान पद्धतीच्या अल्पोहारगृहाची आपुलकीची सोय येथे करण्यात आली आहे. प्रशस्त वाहनतळ, मालाच्या रक्षणासाठी २४ तास सुरक्षा यंत्रणा, निसर्गरम्य परिसर आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करणारा नम्र व सेवाभावी कर्मचारी वृंद याठिकाणी कार्यरत आहे. कांदा , भाजीपाल्यासाठी वेगवेगळ्या वेळेत लिलाव पद्धत, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि शेतमालाला योग्य स्पर्धात्मक भाव मिळतो. व्यापाऱ्यांसाठी सर्वसमावेशक व्यवस्था, नामांकित आणि अनुभवी खरेदीदारांचा सक्रिय सहभाग हे या बाजाराचे बलस्थान आहे. बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राहण्याची उत्तम सोय, शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशस्त शेड व सुरक्षेची चोख व्यवस्था येथे उपलब्ध करून दिली आहे. व्यापार आणि नफ्यापलीकडे जाऊन सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणारा हा बाजार आज कृषी विपणन क्षेत्रात आदर्श ठरला आहे. योग्य भाव, पारदर्शक कारभार, सुरक्षितता आणि आपुलकीचे वातावरण देणारा ''खाजगी कसमादे बाजार, ढोलबारे'' खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या समृद्धीचे प्रवेशद्वार ठरत आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com