शिक्षक पुरस्कार जाहीर

शिक्षक पुरस्कार जाहीर
Published on
धुळे ः टुडे १ साठी -- आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर - धुळे जिल्हा परिषदेकडून तिघा शिक्षकांची निवड - किंवा - धुळे जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षकांची निवड - शिक्षक दिन : तिघांचा यथोचित सन्मान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत २०२५- २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील तीन कर्तृत्ववान प्राथमिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार १० प्रस्ताव प्राप्त झाले. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सीईओ बाबासाहेब बेलदार यांच्या अध्यक्षतेत स्थापन झालेल्या निवड समितीसमोर २० ऑगस्टला पात्र शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील गुणानुक्रमे सर्वोत्तम ठरलेल्या शिक्षकांची शिफारस अंतिम मान्यतेसाठी नाशिक विभागीय महसूल आयुक्तांकडे सादर करण्यात आली. त्यानुसार तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील आदर्श शिक्षक असे : दिनेश गुलाबराव धनगर (नरडाणा स्टेशन, ता. शिंदखेडा), मुबशेरा किफायत खान (उर्दू शाळा, पिंपळनेर, ता. साक्री), चंपाललाल गयबू पाटील (लौकी, ता. शिरपूर). शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या या पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना लवकरच विशेष सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांनी दिली.
Marathi News Esakal
www.esakal.com