शहरात शिक्षक दिन, जन्माष्टमी, दहीहंडी उत्साहात

शहरात शिक्षक दिन, जन्माष्टमी, दहीहंडी उत्साहात
Published on
शहर टुडे पान २ : मेन फिचर ---- शीर्षक कृष्णजन्माच्या भक्तिरसात न्हाले विद्यार्थी उपशीर्षक शाळांमध्ये जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्साह; श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषा ठरले आकर्षण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषा, भजन, नृत्य, गरबा-दांडिया तसेच दहीहंडी फोडण्याच्या उपक्रमातून उत्सवाचा आनंद लुटला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनाचाही अनुभव घेतला. --- NSK26H28829 : ज. सू. खडके प्राथमिक विद्या मंदिर. ज. सू. खडके विद्यालय ज. सू. खडके प्राथमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात ‘हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’ या भजनाने झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष पवन खंबायत, माजी अध्यक्ष गणेश काळे, संस्थेचे चिटणीस अवधूत पाटील, स्वाती व सुनील चौधरी, स्नेहा खंबायत यांच्या हस्ते बाळकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. मुख्याध्यापक सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. महाराणा प्रताप विद्यालय स्व. शेठ बी. एम. जैन प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन व गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक संजय चौधरी, पर्यवेक्षक प्रवीण महाले, कनिष्ठ विभागप्रमुख संजय पाटील आणि प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास चौधरी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि संस्थेचे आद्यसंस्थापक स्व. भिकमचंद जैन यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थी शिक्षक कामेश सपकाळे, ईशान काकडे, कमलेश सपकाळे व अनिकेत गवळे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी कृष्णगीतांवर सामूहिक नृत्य सादर केले. मानवी मनोरे रचून ढोल-ताशांच्या गजरात महेश सपकाळे या गोविंदाने दहीहंडी फोडली. ---- NSK26H28827 : के. जी. मणियार प्राथमिक विद्यालय के. जी. मणियार विद्यालय जय भवानी शिक्षण मंडळ, मेहरुण संचलित के. जी. मणियार प्राथमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव झाला. मुख्याध्यापिका सविता चौधरी यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहात दहीहंडी फोडली. सय्यद हम्मादअली सय्यद सद्दाम याने श्रीकृष्ण, तर पूजा सुरतसिंह पवार हिने राधेची वेशभूषा साकारली. अन्य विद्यार्थ्यांनीही श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभाग घेतला. ---- NSK26H28868 जळगाव : के. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालगोपाळांसह प्राचार्य माधुरी कुलकर्णी व शिक्षकवृंद. के. सी. इंग्लिश मीडियम स्कूल पिंप्राळा परिसरातील मानराज पार्कजवळील के. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवात बालगोपाळांनी चांगलीच रंगत आणली. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के. जी. व सिनियर के. जी. चे सर्व विद्यार्थी राधा व कृष्ण वेषात स्कूलमध्ये आले होते. पार्थ पाटील हा विद्यार्थी वसुदेव बनला होता. कृष्ण जन्म झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या दहीहंडी गाण्यांवर डान्स केला. सिनियर केजीच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. सर्वांना गोपालकाल्याचा प्रसाद देण्यात आला. प्राचार्या माधुरी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले. पालकांनी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. --- बी. यू. एन. रायसोनी स्कूल प्रेमनगर येथे शिक्षक दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अनोखा संगम साधण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ साजऱ्या झालेल्या शिक्षक दिनानिमित्त आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत वर्गावर जाऊन अध्यापन केले. जन्माष्टमीनिमित्त नर्सरी ते ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, सुदामा, वासुदेव व गोपिकांच्या वेशभूषा साकारल्या. --- NSK26H28843 : जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रसंगी बाळकृष्णाच्या वेशातील विद्यार्थी. काशिनाथ पलोड स्कूल काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण पूजन व आरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय भजनांनी परिसर दुमदुमून गेला. शिक्षकांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील मूल्ये, भगवद्गीतेतील उपदेश तसेच वर्तमान काळातील त्यांच्या विचारांची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रतीक पाटणे याने केले, तर देवांश जयस्वाल याने आभार मानले. शेवटी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमप्रमुख म्हणून ज्ञानेश्वर पवार व चैताली चित्ते यांनी जबाबदारी सांभाळली. --- सर्वोदय विद्यालय, नशिराबाद नशिराबाद येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (ता. ४) श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी शाळेतील चिमुकले विद्यार्थी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गीते, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या आकर्षक वेशभूषा आणि उत्स्फूर्त सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या दहीहंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मुख्याध्यापिका मंजू बारी यांनी सणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास नशिराबाद नगरपरिषदेचे केंद्रप्रमुख राहुल संसारे व अविनाश पाटील यांनी उपस्थित होते. ---- NHI26A00249 : न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद नशिराबाद : नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक जनार्दन माळी, ॲड. प्रदीप देशपांडे तसेच मुख्याध्यापक प्रवीण महाजन उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण, वासुदेव, देवकी, यशोदा, कालियानाग आणि बाळ गोपाळांच्या वेशभूषेतून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन वैशाली पाचपांडे, भावना भावसार, सुनीता शिवरामे, मनीषा घोडकर व स्वाती चौधरी यांनी केले. मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. ---- NSK26H28853 जळगाव : सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जन्माष्टमीनिमित्त साकारण्यात आलेल्या ‘मिनी गोकुळ’मध्ये बालकृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थी व शिक्षक. सरस्वती इंटरनॅशनल स्कूल जळगाव : मोहाडी येथील सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला व शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्याध्यापिका मालू सापकाळे, उपमुख्याध्यापिका रचना खिलोसिया, समन्वयक व समुपदेशक पूनम चौधरी तसेच प्रशासकीय अधिकारी संदीप इंगळे उपस्थित होते. जन्माष्टमीनिमित्त शाळेच्या परिसरात आकर्षक ‘मिनी गोकुळ’ साकारण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ---- NSK26H28773 जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवात सहभागी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी. डॉ. वर्षा पाटील महाविद्यालय जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाला व दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सर्वप्रथम प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी श्रीकृष्ण पूजन, आरती केली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व मानवी मनोरे गोपाळकाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मुलींच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मानवी मनोरे रचून अनुराधा सुरडकर इने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. यानिमित्ताने महाविद्यालयात राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा, भजन व संगीत सादरीकरण या स्पर्धा झाल्यात. आयएमआर महाविद्यालय गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव महाविद्यालयात संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी श्रीकृष्ण पूजनाने आणि आरतीने केली. ढोल-ताशांच्या गजरात मानवी मनोरे रचून अनिकेत चौधरी याने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. महाविद्यालयात खालील विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी केले. ---- NSK26H28761 जळगाव : सरस्‍वती इंग्लिश स्कूलमध्‍ये श्रीकृष्ण जन्‍माष्‍टमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थी. सरस्‍वती इंग्लिश स्कूल लेवा एज्‍युकेशन युनियन संचलित सरस्‍वती प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्‍ये श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त शाळेत विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्‍ण, राधा तसेच गोकुळातील विविध पात्रांच्‍या वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी श्रीकृष्‍णाच्‍या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारीत कार्यक्रम सादर केले. यात श्रीकृष्‍णाच्‍या बाललिला तसेच दहीहंडीच्‍या पारंपरिक उत्‍सवाचे सादरीकरण केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. --- NSK26H28866 जळगाव : वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी फोडताना विद्यार्थी. ..... वर्ल्ड इंग्लिश स्कूल जळगाव येथील वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण जन्मोत्सवाने झाली. संस्था संचालिका राजश्री सोनवणे यांच्या उपस्थित जन्मोत्सव कार्यक्रम झाला. तसेच संस्थापक हिरालाल सोनवणे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com