(टुडे १ : शहर-जिल्हा ॲंकर कॉमन)
---
NSK26H28844 (फोटो ठळक घ्यावा)
जळगाव : जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील आदी.
-------
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ‘दीपस्तंभ’ बनावे
पालकमंत्री गुलाबराव पाटील : १५ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : बदलत्या काळात शाळांची पटसंख्या वाढविणे आणि टिकविणे हे आज शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे; मात्र हे आव्हान समर्थपणे पेलण्याची ताकदही आपल्या शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ धडे शिकविण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘भविष्याचे शिल्पकार’ बनावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे येथील भैयासाहेब गंधे हॉल, ला. ना. हायस्कूल येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांना पालकमंत्री पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
वेतनवाढीसाठी प्रयत्न
पालकमंत्री पाटील म्हणाले, की काळ बदलतोय, तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे; पण ‘कितीही फाइव्ह जी- सिक्स जी येऊ द्या, गुरु-जींशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची बंद असलेली आगाऊ वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहील.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, शिक्षणप्रेमी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रा. पाटील, आमदार पाटील, प्राचार्य डॉ. झोपे यांनी मनोगत मांडले. पुरस्कारप्राप्त गिरीश महाजन व मनीषा शिरसाठ या दोन शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक नाना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी आभार मानले.
चौकटीत
पुरस्कारार्थी शिक्षक
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये योगेश्वर पाटील (आटोळे, ता. अमळनेर), विलास माळी (महिंदळे, ता. भडगाव), ईश्वर मंडावरे (येवती, ता. बोदवड), नीलेश पाटील (महादेव माळ, ता. भुसावळ), प्रभाबाई पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), हरि बाविस्कर (कुरवेल तावसे बुद्रुक, ता. चोपडा), मनीषा शिरसाठ (पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव), सोनाली बोरसे (आडगाव, ता. एरंडोल), मनीषा मारकड (भोकर, ता. जळगाव), जुगलकिशोर ढाकरे (रांजणी, ता. जामनेर), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर), संजू राठोड (नाचणखेडा, ता. पाचोरा), स्मिता देसले (कराडी, ता. पारोळा), दीपक कोडे (कुसुंबे, ता. रावेर) आणि गिरीश महाजन (हिंगोणे, ता. रावेर) यांचा समावेश आहे.
---------------