टुडे पान ४ मेन फिचर
NSK26H28858
जळगाव : फुले मार्केटची पाहणी करताना महापालिका आयुक्त आदित्य जिवने, पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे आदी अधिकारी व कर्मचारी.
----------------
NSK26H28859
अतिक्रमण काढल्यामुळे फुले मार्केटमधील मोकळा झालेला परिसर.
---------------
NSK26H28861
मार्केटमध्ये उभे असलेले अतिक्रमण विभागाचे ट्रॅक्टर.
--------------
NSK26H28863
दाणाबाजारात अतिक्रमण निर्मूलन पाहणीप्रसंगी झालेली गर्दी.
..........
अतिक्रमणाविरोधात ‘टास्क फोर्स’ ॲक्शन मोडवर
आयुक्तांनी शहर काढले पिंजून; फुले मार्केट, दाणा बाजारामधील अतिक्रमण हटविण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी अतिक्रमणाविरोधात शनिवारी थेट रस्त्यावर उतरून पाच तास धडक पाहणी केली. अजिंठा चौफुलीपासून सुरू झालेली ही मोहीम दाणाबाजार, फुले मार्केटमार्गे जुना कापड बाजारापर्यंत पोहोचली. रस्त्यावर आलेले शेड, ओटे, ताडपत्री आणि विक्रीचे साहित्य हटविण्यासोबतच नियम न पाळणाऱ्या गाळेधारकांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलनासाठी शुक्रवारी टास्क फोर्सची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयुक्तांनी स्वतः कारवाईचे नेतृत्व केले. सकाळी आठला पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्यासह त्यांनी अजिंठा चौफुलीची पाहणी केली. समांतर रस्त्यावरील पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता अतुल पाटील, अभियंता विजय मराठे यांच्यासह महापालिका व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुदत संपली; आता कारवाई
दाणाबाजारात रस्त्यापर्यंत आलेले दुकानांचे शेड पाहून आयुक्तांनी संबंधित व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वी ५० दिवसांची मुदत देण्यात आली होती. तरीही परिस्थिती कायम असल्याने आता स्वतःहून अतिक्रमण हटवा; अन्यथा दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
फुले संकुलात तपासणी
फुले संकुलात दुकानदारांनी बाहेर वाढविलेल्या अतिक्रमणांबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. अनधिकृत ओटे व इतर अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देतानाच संकुलाच्या तळघरातही अतिक्रमण राहता कामा नये, असे स्पष्ट केले. पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग खुले ठेवण्यासोबतच संकुलाचे विद्रुपीकरण करणारे अनधिकृत नामफलक व जाहिरात फलक हटविण्याचे निर्देश देण्यात आले. आदेशाचे पालन न करणाऱ्या गाळेधारकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
चौकट
जुना कापड बाजारात दुकान सील
पोलन पेठेतील जुना कापड बाजारात रस्त्यावर विक्रीचे साहित्य ठेवून व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या एका धान्यविक्रेत्याचे दुकान सील करण्याचे आदेश देण्यात आले. अनधिकृत ओटे, शेड आणि ताडपत्री तातडीने हटविण्यासही सांगण्यात आले.
चौकट
आयुक्तांनी या दिल्या सूचना..
- सर्व संकुलातील व्यावसायसायिकांना कचरापेटी बंधनकारक करा.
- स्पिकरद्वारे संकुलामध्ये जाहीर आवाहन करा.
- दुकानाबाहेरील वाढीव बांधकाम, शेड तोडावे.
- वाहनतळासाठी जागा मोकळी करा.
- पादचारी मार्गावर हॉकर्स बसायला नको.
- लोंबकलेल्या वायरी, दोऱ्या काढून टाका.
- जो एकणार नाही त्याच्यावर कारवाई करा.