‘जय कन्हैयालाल की..’चा जयघोष

‘जय कन्हैयालाल की..’चा जयघोष
Published on
NSK26H28796 जळगाव : श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सवानिमित्त द्वारकानगर परिसरातील राधा-कृष्‍ण मंदिराची करण्यात आलेली सजावट व सुरू असलेला भजनाचा कार्यक्रम. ––– ‘जय कन्हैयालाल की..’चा जयघोष (उपशीर्षक) कृष्‍ण जन्‍माष्‍टमीनिमित्त शहरातील मंदिरांमध्‍ये कार्यक्रम सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ५ : ‘जय कन्हैयालाल की’, ‘बाँकेबिहारी लाल की जय’च्या जयघोषात शहरातील सर्व कृष्ण मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मसोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मध्‍यरात्रीपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन करून रात्री बाराला भगवान श्रीकृष्‍णाला पाळण्यात ठेवून भाविकांनी पाळणा हलवत भजन म्‍हटले. यावेळी श्रीकृष्णभक्तांची गर्दी मंदिरात उसळली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्‍याने आज (ता.४) शहरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा करण्याच्‍या अनुषंगाने सकाळपासूनच तयारी सुरू होती. यासोबतच श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यासाठी मंदिरात सजावट करण्यात आली होती. तर मध्यरात्री बाराच्‍या सुमारास श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. चौकट द्वारकानगरात कार्यक्रम शहरातील द्वारकानगर परिसरात असलेल्‍या श्रीकृष्‍ण मंदिरावर देखील जन्‍मोत्‍सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त मंदिर आकर्षक सजविण्यात आले होते. सायंकाळपासून मंदिरावर परिसरातील महिला भजनी मंडळाने कृष्‍ण भजन, गौळणी गायल्‍या. तर रात्री बाराला भगवान कृष्‍णाची मूर्ती पाळण्यात ठेवून जन्‍मोत्‍सव साजरा करण्यात आला.
Marathi News Esakal
www.esakal.com