नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पुस्तक महोत्सव

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पुस्तक महोत्सव
Published on
सिंहस्थ कुंभमेळ्यात पुस्तक महोत्सव भारतीय पुस्तक न्यासाला ‘सावाना’ देणार प्रस्ताव दीपिका वाघ : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्यात पुस्तक महोत्सव घेण्यासाठी भारतीय पुस्तक न्यासाला (एनबीटी) १८६ वर्षांची परंपरा असलेले सार्वजनिक वाचनालय प्रस्ताव देणार आहे. या प्रस्तावला शिक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाल्यास सिंहस्थ कुंभमेळ्यात पुस्तक महोत्सव होणार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या भारतीय पुस्तक न्यास स्वायत्त संस्था आहे. नाशिकमधून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या मंजुरीने सार्वजिनक वाचनालय भारतीय पुस्तक न्यासाला लवकरच प्रस्ताव प्रस्ताव पाठविणार आहे. विशेष म्हणजे २०२५ मध्ये प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात भारतीय पुस्तक न्यासाने २४ तास सुरू राहणारा पुस्तक मेळावा घेतला होता. या उपक्रमाला तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत भाविकांना चांगला प्रतिसाद दिला होता. प्रयागराजच्या धर्तीवर या उपक्रमाला नाशिकमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, या उद्देशाने मेळाव्याऐवजी भव्यदिव्य पुस्तक महोत्सव घेण्याचा विचार सुरू आहे. या प्रक्रियेला साधारण दोन-तीन महिन्यांचा कालवधी लागणार असून, पुस्तक महोत्सवानिमित्त भाविकांना सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाबरोबरच वाचनाची पर्वणी अनुभवता येणार आहे. असा होता प्रयागराजचा उपक्रम प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात पुस्तक विक्री मुख्य उद्देश नव्हता, तर विविध राज्यांतून आलेल्या भाविकांकडे बराच अवधी असल्याने त्यांनी पुस्तके हाताळावी या हेतूने मेळावा घेण्यात आला होता. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी यादरम्यान प्रयागराज येथे उपक्रम झाला. सेक्टर १ परेड ग्राउंड येथील ‘नमामि गंगे’ मंडपात ‘रीडिंग लाउंज’ उभारण्यात आले होते. येथे भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती, कुंभ व अध्यात्माशी संबंधित पुस्तकांबरोबर हिंदी-इंग्रजीबरोबर इतर भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध होती. ‘रीडिंग लाउंज’मध्ये भाविकांना पुस्तके मोफत वाचण्याची सुविधा करून देण्यात आली होती. त्याचबरोबर ‘एनबीटी पुस्तक परिक्रमा’ माध्यमातून पुस्तकांनी सज्ज विशेष बसमधून महाकुंभ परिसरात पुस्तके भाविकांपर्यंत नेण्यात आली. पुस्तक विक्रीवर २५ टक्के सवलत देण्यात आली होती. कुंभातील अनुभवांवर आधारित ‘एनबीटी’ने ‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ पुस्तकाची निर्मिती केली आहे. कोट प्रयागराजच्या कुंभमेळ्यात घेण्यात आलेल्या पुस्तक मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नाशिकमधून प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. -प्रा. मिलिंद मराठे, अध्यक्ष, भारतीय पुस्तक न्यास, दिल्ली जिल्हाधिकारी याबाबत सकारात्मक असून, त्यांच्या सहमतीने सार्वजनिक वाचनालय भारतीय पुस्तक न्यासाला प्रस्ताव देणार आहे. -संजय करंजकर, कार्याध्यक्ष, सावाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com