फोटो -NSK26H28865
समीक्षा अहिरे यांना
पीएच. डी. जाहीर
नाशिक प्रतिनिधी : येथील रहिवासी आणि म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील संशोधक विद्यार्थिनी समीक्षा गंगाधर अहिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे. समीक्षा अहिरे यांनी ''इफेक्ट ऑफ डिफरंट न्यूट्रिएंट लेव्हल्स ऑन स्पेक्ट्रल रिस्पॉन्स अँड यिल्ड ऑफ सोयाबीन इन इन्सेप्टिसोल'' या विषयावरील शोधनिबंध, डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना डॉ. सुनील कदम, डॉ. रितू ठाकरे, डॉ. श्रीगणेश शेळके यांसह डॉ. भीमराव कांबळे यांचे सहकार्य मिळाले. कुलगुरू डॉ. विलास खर्चे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे आणि नाशिकचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले होते. डॉ. समीक्षा या साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे आणि के. जे. मेहता हायस्कूल ना. रोड येथील आदर्श शिक्षिका प्रतिभा अहिरे यांच्या सुकन्या आहेत. डॉ. समीक्षा ह्यांनी यापूर्वी कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत मृदाविज्ञान विषयातील दोन नेट, ''युजीसी''च्या अंतर्गत पर्यावरण विषयावरील नेट व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत राबविण्यात येणारी सेट परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण केलेली आहे.