(जिल्हा - शहर पानावर आवश्यक)
----------
NSK26H28871
जळगाव : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांसोबत अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, हाजी मुक्ती हारून, प्रवीण सुरवाडे आदी.
---------------
काँग्रेसतर्फे २५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
जळगावात कार्यक्रम; उल्लेखनीय कार्याचा मान्यवरांकडून गौरव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज (ता. ५) शिक्षक दिनानिमित्त काँग्रेस भवनात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, धनगर पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांच्या योगदानासंदर्भात व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव मनोगत व्यक्त केले.
प्रा. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक तर जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप सोनवणे यांनी आभार मानले. दीपक सोनवणे युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पटेल, अध्यक्ष कौस्तुभ पाटील, जाकीर बागवान, अर्चना गाडे, छाया कोरडे, लीला सोनवणे, प्रभाकर महाजन आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
पुरस्कारार्थी आदर्श शिक्षक
रूपाली पाटील (पाचोरा), सुनीता पाटील (जळगाव), रूपाली देवरे (जळगाव), डॉ. अर्चना सूर्यवंशी (जळगाव), अनिता सतीश पाटील (जळगाव), प्रा. सागर सोनवणे (जळगाव), प्रसन्न रमेश (खंडाळे, चाळीसगाव), भटू आव्हाळे (एरंडोल), राजेंद्र मधुकरराव देशमुख (अमळनेर), प्रमोद पाटील (धरणगाव), हिलाल पाटील (अमळनेर), विनोद पाटील (चोपडा), दीपक सोनार (चोपडा), प्रा.वासुदेव पाटील (जळगाव), गजानन सुरवाडे (भुसावळ), मोहसीन खान अजित खान (जळगाव), अशोक पार्टी (जळगाव), मनोहर तेजवानी (जळगाव,) डॉ.संजयकुमार सोनवणे (धरणगाव), सुनील जाधव (पारोळा), प्रा. इक्बाल मिर्झा (जळगाव), नरेंद्र भोई (जळगाव), भिका सपकाळे (आवार, ता.जळगाव), दिनेश चव्हाण (एरंडोल).
-----