जळगाव–म्हसावद रेल्वेमार्गावर १२ तासांचा ब्लॉक

जळगाव–म्हसावद रेल्वेमार्गावर १२ तासांचा ब्लॉक
Published on
जळगाव–म्हसावद रेल्वेमार्गावर १२ तासांचा ब्लॉक मंगळवारी सहा मेमू रद्द; १८ गाड्यांचे नियमन, दोन गाड्यांच्या वेळेत बदल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव–शिरसोली–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, सक्षम आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे. या कामामुळे मंगळवारी (ता. ८) या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. या कामासाठी सोमवारी (ता.७) पूर्व-नॉन-इंटरलॉकिंगचे काम, तर मंगळवारी (ता.८) रोजी नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही गाड्या रद्द, काहींचे नियमन, तर काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. --------- सहा मेमू गाड्या रद्द रेल्वे घेतलेल्या ब्लॉकमुळे मंगळवारी इगतपुरी – भुसावळ (११११९), भुसावळ – इगतपुरी (१११२०), भुसावळ–देवळाली (११११३), देवळाली – भुसावळ (११११४), नाशिक रोड – बडनेरा (६११२९) आणि बडनेरा–नाशिक रोड (६११३०) या सहा मेमू गाड्या त्यांच्या प्रारंभिक स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. ------ लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेवर परिणाम अमृत भारत, एक्सप्रेससह एकूण १८ गाड्यांचे विविध स्थानकांवर वेळेनूसार थांबणार आहे. यामध्ये २२५९० हडपसर–बनारस अमृत भारत एक्सप्रेसला माहेजी येथे २ तास ५० मिनिटे, तर २२५८९ बनारस–हडपसर अमृत भारत एक्सप्रेसला भुसावळ येथे २ तास ३० मिनिटे थांबविण्यात येईल. याशिवाय बंगळूर–नवी दिल्ली, मुंबई–पटना, लोकमान्य टिळक टर्मिनस–छपरा, हटिया–पुणे, जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस आदी गाड्यांचेही विविध स्थानकांवर थांबविल्या जाणार आहे. ----- वेळेत बदल झालेल्या या गाड्या दोन गाड्यांच्या वेळेत बदल केले असून यात मंगळवारी २६१०२ अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही नियोजित सकाळी ९.५० ऐवजी दुपारी १२.५० ला अजनी येथून सुटेल. तसेच १९००४ भुसावळ – दादर एक्सप्रेस नियोजित सायंकाळी ५.४० ऐवजी ६.४० ला भुसावळहून रवाना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com