फोटो -NSK26H28890
महाराष्ट्र कलेक्शन
------
फोटो - NSK26H28891
योगेश जाधव
----
फोटो -NSK26H28892
मयूर जाधव
-----
व्यवसायासह सामाजिक कार्यातून भरारी
--------------------------------
युवा उद्योजक योगेश जाधव
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मालेगाव येथील युवा उद्योजक योगेश दगाजी जाधव यांनी व्यवसायात यशाला गवसणी घातली आहे. हातमागावरील छोट्याशा कापड व्यवसायापासून त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. शहरातील विश्वासार्ह उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
- सुरेश खैरनार, निमगाव (फोटो नाही)
योगेश जाधव हे मुळचे मालेगावचेच. शहरातील मित्रनगर-सोयगाव वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या जाधव यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती साधारण होती. वडील दगाजी जाधव हातमागावरील रेडिमेड कपड्यांचा छोटा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आई-वडील आणि पाच भावंडांच्या मोठ्या कुटुंबात वाढताना योगेश यांनी लहानपणापासूनच संघर्ष अनुभवला. परिस्थितीशी दोन हात करतानाच कष्ट, प्रामाणिकपणा व स्वाभिमान या मूल्यांचा वारसा त्यांना कुटुंबाकडून मिळाला. योगेश जाधव यांचे प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण मालेगावातच झाले. त्यांनी बी.एस्सी.च्या प्रथम वर्षात प्रवेशही घेतला. मात्र, शिक्षणादरम्यान वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाची गरज लक्षात घेऊन त्यांनी कापड व्यवसायात सक्रिय सहभाग घेत पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
व्यवसायाचे कोणतेही औपचारिक शिक्षण जाधव यांना नव्हते. असे असले तरी व्यवसायाचे बाळकडू त्यांनी घरातूनच मिळविले. व्यवसायातील प्रत्येक बारकावे प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करण्यास सुरुवात केली. हातमागावरील छोट्या व्यवसायातून सुरू झालेला हा प्रवास पुढे वाढत गेला. जिद्द व प्रामाणिकपणाचे फळ मिळत गेले. आधुनिक व्यावसायिक दृष्टिकोनामुळे व्यवसाय विस्तारला. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून त्यांनी साडी विक्री आणि रेडिमेड कपड्यांच्या क्षेत्रात आधुनिक पद्धतींचा अवलंब केला. काळानुरूप बदल स्वीकारत व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यावर त्यांनी भर दिला. याच प्रयत्नांतून येथील सटाणा नाका भागातील ''महाराष्ट्र कलेक्शन'' या नावाने त्यांच्या व्यवसायाला शहरासह पंचक्रोशीत वेगळी ओळख मिळाली.
भावाच्या साथीमुळे यशाचा नवा अध्याय
योगेश जाधव यांच्या यशामागे त्यांचे लहान बंधू मयूर जाधव यांचेही मोलाचे योगदान आहे. व्यवसायाचे नियोजन, व्यवस्थापन आणि ग्राहकसेवा या जबाबदाऱ्या दोघांनी समन्वयाने सांभाळल्या. त्यांच्या एकजुटीमुळे व्यवसायाला नवी दिशा मिळाली. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार उत्कृष्ट सेवा देणे, गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि विश्वास टिकवून ठेवणे, या गुणांमुळे ''महाराष्ट्र कलेक्शन'' हे नाव मालेगावसह परिसरातील ग्राहकांच्या पसंतीचे केंद्र बनले आहे.
कुटुंब : यशाचा महत्त्वाचा पाया
योगेश जाधव यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. वडील दगाजी जाधव यांचे मार्गदर्शन, आई कल्पना जाधव यांनी दिलेले संस्कार, तसेच लहान बंधू मयूर जाधव यांची खंबीर साथ हे त्यांच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहेत. याशिवाय पत्नी हर्षदा जाधव यांनीही प्रत्येक टप्प्यावर मोलाचे सहकार्य करत व्यवसायाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सामाजिक बांधिलकीचे कोंदण
व्यवसायात यश मिळवूनही योगेश जाधव यांची समाजाप्रति असलेली कृतज्ञता आणि काहीतरी सकारात्मक योगदान देण्याची भावना त्यांच्या प्रत्येक कार्यातून दिसून येते. गोसेवा ही त्यांची विशेष आवड आहे. रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी साडी वाटप, दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वितरण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, जनजागृती मोहिमा तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ''महाराष्ट्र कलेक्शन'' आणि गोरखगाथा या माध्यमांतून त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने पाठबळ दिले आहे.
कोट...
प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांचा विश्वास जपा. आयुष्यातील कोणतीही मोठी उंची एका दिवसात गाठता येत नाही. सतत शिकत राहा. छोट्या-छोट्या प्रयत्नांची सातत्यपूर्ण साखळीच मोठे यश घडवते. समाजाने आपल्याला जे दिले आहे, त्याची परतफेड करण्याची जबाबदारी प्रत्येकाने ओळखली पाहिजे.
- योगेश जाधव, युवा उद्योजक, मालेगाव