संक्षिप्त
संत सेना महाराजांची
मंगळवारी पुण्यतिथी
जळगाव : संत सेना नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर संघटनेतर्फे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता.८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहाला सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे कार्यक्रम होणार आहे. संत सेना महाराज यांची प्रतिमा पूजन तसेच महाआरती होईल. तसेच समाजासाठी तसेच संघटनेसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. सर्व नाभिक समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
केदारनाथ मंदिराची
साकारतेय प्रतिकृती
जळगाव : सुभाष चौक, सराफ बाजार परिसरातील श्री भवानी तथा महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या श्रावण सोमवार महोत्सवाचा (ता.७) समारोप होणार आहे. यानिमित्त मंदिराच्या सभागृहात केदारनाथ मंदिराची ८ बाय ८ फूट आणि १० फूट उंचीची भव्य प्रतिकृती सचिन राणा व बंटी पुरोहित साकारणार आहे. सायंकाळी पाचपासून हा देखावा भाविकांसाठी खुला राहणार आहे. सकाळी अकराला ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक होईल.
महाआरतीनंतर ‘हर घर सुंदरकांड’ भजन मंडळाची भजनसंध्या होईल. दीपा तापडिया, किरण शर्मा, मेघराज सोनी व प्रदीप जोशी शिवभजने सादर करतील. रात्री नऊला शयन आरतीनंतर होणार असून, भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनोद त्रिपाठी व किसनलाल पुरोहित यांनी केले आहे.