नंदुरबारात गोकुळाष्टमी उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह, गोविंदांनी फोडल्या मानाच्या दहीहंड्या

नंदुरबारात गोकुळाष्टमी उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह, गोविंदांनी फोडल्या मानाच्या दहीहंड्या
Published on
(टुडे पान ३ ला सेकंड मेन) -------------------- फोटो : NSK26H28897 नंदुरबार : शहरातील सुभाष चौकात आयोजित झालेल्या कार्यक्रमात दहीहंडी फोडताना गोविंदा. फोटो : NSK26H28899/NSK26H28900 नंदुरबार : येथील जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील. शेजारी शेखर मराठे, संजय भदाणे, प्रतापसिंग राजपूत, राजू पवार, देवेंद्र बोरसे आदी. दुसऱ्या छायाचित्रात दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा सत्कार करताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील. शेजारी शिवसेना जिल्हाप्रमुख पंडीत माळी व मान्यवर. फोटो : NSK26H28901 नंदुरबार : येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री स्वामी समर्थनगर परिसरात आयोजित श्रीकृष्ण जन्मसोहळाप्रसंगी भगवान श्रीकृष्णाला दाखविण्यात आलेला ५६ भोग प्रसाद. ----------------------------------- नंदुरबारात गोपाळकालानिमित्त दहीहंडीचा थरार गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी; जय बजरंग व्यायामशाळेतर्फे आयोजित उत्सवात १२ मंडळांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ५ : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘गोविंदा आला रे आला’चा जयघोष आणि ढोल- ताशांचा गजर यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. शुक्रवारी मध्यरात्री मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर, शनिवारी (ता. ५) नंदुरबार शहरातील सुभाष चौकात दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. जय बजरंग व्यायामशाळेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात शहरातील जवळपास १२ मंडळांनी सहभाग घेतला. या वेळी गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. जय बजरंग व्यायामशाळेचे अध्यक्ष शेखर मराठे, सचिव देवेंद्र बोरसे, संजय भदाने, प्रताप राजपूत, जितेंद्र मराठे, राजेंद्र पवार, राजेश परदेशी, नरेंद्र पाटील, धर्मेंद्र परदेशी, संजय चौधरी, दिनेश कुंकारी, रिद्धेश सोलंकी, क्षितिज मराठे, शंभू मराठे, देव मराठे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या उत्सवामुळे शहरातील वातावरण भक्तिमय तसेच उत्साहपूर्ण झाले होते. आयोजकांकडून सहभागी मंडळांचे स्वागत करण्यात आले. शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. उत्सवात संत सावता व्यायामशाळा, संताजी व्यायामशाळा, संकटमोचन व्यायामशाळा, गांधी नगर, जाणता राजा चौक मित्रमंडळ, वीर बिरसा मुंडा व्यायामशाळा, गिरीविहार गेट, श्री द्वारकाधीश व्यायामशाळा, जय हनुमान व्यायामशाळा, वायू पुत्र व्यायामशाळा, रोकडेश्वर व्यायामशाळा, श्री गुरुकृपा होलार समाज व्यायामशाळा, वीर बिरसा मुंडा मित्रमंडळ, देसाईपुरा या व्यायामशाळेच्या गोविंदांनी दहिहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला. ------ शहरात चोख बंदोबस्त युवकांच्या सहभागामुळे आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जय बजरंग व्यायामशाळेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला विशेष रंगत आली. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नंदुरबार पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर बदल करण्यात आले होते. आयोजकांतर्फे यशस्वी गोविंदा पथकांना रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देऊन गौरव केला. संस्कृती आणि शिस्तीचे दर्शन घडवत नंदुरबारकरांनी दहीहंडी उत्सव अविस्मरणीय केला. मध्यरात्री रंगला जन्मोत्सव दरम्यान, शुक्रवारी गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. रात्री ठीक १२ वाजता पाळणा हलवून आरती करण्यात आली. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांबाहेर रांगा लावल्या होत्या. भजन, कीर्तन आणि भक्तीगीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com