एसआयआरचा भार; महसूलच्या बदल्यांना लांबल्या

एसआयआरचा भार; महसूलच्या बदल्यांना लांबल्या
Published on
महसूलच्या बदल्या पुन्हा लांबणीवर ‘एसआयआर’चा फटका : अधिकाऱ्यांमध्ये नाराजी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला मुदतवाढ मिळाली असून, ४ नोव्हेंबरला आता अंतिम याद्यांची प्रसिद्धी होणार आहे. ‘एसआयआर’च्या लांबलेल्या कार्यक्रमामुळे महसूल विभागाच्या बदल्या पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाचवेळी ‘एसआयआर’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयोगाने सर्वप्रथम या कार्यक्रमाचे वेळापत्रक घोषित करताना ७ सप्टेंबरला अंतिम याद्यांची प्रसिद्धी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. तोपर्यंत महसूलमधील अपर जिल्हाधिकारी ते तहसीलदारपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे स्पष्ट आदेश आयोगाचे होते. त्यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात का होईना बदल्यांना मुहूर्त लागेल, अशी अधिकाऱ्यांची धारणा होती. परंतु आयोगाने पहिल्या टप्प्यातच या कार्यक्रमाला दोनदा मुदतवाढ दिली. परिणामी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी आता ४ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. या मध्यंतरीच्या काळात महसूल अधिकाऱ्यांना मतदार यादीवरील हरकती व दाव्यांवर रीतसर सुनावण्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर अगोदरच कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अंतिम मतदारयादी प्रसिद्धीपर्यंत बदल्यांनादेखील मुहूर्त लागणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच महसूल प्रशासनात खांदेपालट होऊ शकते. परिणामी अगोदर राष्ट्रीय जनगणना व त्यानंतर मतदार याद्यांच्या कार्यक्रमामुळे वैतागलेल्या अधिकाऱ्यांना आवडीच्या ठिकाणी बदलीसाठी आणखी अडीच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘एसआयआर’वर लक्ष राज्यभरात ‘एसआयआर’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा पहिला टप्पा पार पडला आहे. ३१ ऑगस्टपासून दुसऱ्या व महत्त्वपूर्ण टप्प्यास प्रारंभ झाला असून, ४ नोव्हेंबरपर्यंत तो चालणार आहे. त्यामुळे महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष सध्या केवळ अन्‌ केवळ ‘एसआयआर’च्या कामावर लागून आहेत. मात्र, ‘एसआयआर’चा दुसरा टप्पा पार पडल्यानंतरही बदल्या होतील का? असा प्रश्‍न काही अधिकारी खासगीत उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com