धुळे : टुडे पान १ साठी...ॲंकर
--
फोटो क्रमांक : 28894
धुळे : मनपा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात शिवसेना- राष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिका मांडताना डॉ. तुळशीराम गावित, शहाबाज शाह, सतीश महाले, संजय वाल्हे, दीपक खोपडे, धीरज कलंत्री आदी.
--
विरोधी पक्षनेतेपद आमच्या आघाडीला मिळावे
-
महापौरांकडे अपेक्षा : शिवसेना- राष्ट्रवादी कॉँग्रेस संयुक्त गटाची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार आगामी चार आठवड्यांत विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने महापौरांना दिले आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत दुसरी सर्वांत मोठी आघाडी आमचीच असल्याने विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी महापौरांकडे व्यक्त केली आहे.
-
यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत शनिवारी भूमिका मांडली. शिवसेना जिल्हाप्रमुख गावित, सतीश महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, नगरसेवक दीपक खोपडे, धीरज कलंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते शहाबाज शाह आदी उपस्थित होते. डॉ. गावित म्हणाले, की महापौरांकडे विरोधी पक्षनेतेपद निवडीची मागणी पूर्वीच करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाची संयुक्त नोंदणी झाली असून, एकत्रित १३ नगरसेवकांचा मनपात दुसरा मोठा गट आहे. या अनुषंगाने वारंवार मागणी करूनही महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहाबाज शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. यात चार आठवड्यांत विरोधी पक्षनेता निवडीचे निर्देश दिले असून या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ७) पुन्हा महापौर व आयुक्तांची भेट घेऊन खंडपीठाच्या निकालाची प्रत व मागणीचे पत्र सुपूर्द केले जाणार आहे.
-
दुसरी मोठी आघाडी
नियमानुसार शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी स्वतंत्र नोंदणी न करता एकत्र गट नोंदणी केली असल्यामुळे ही मनपातील दुसरी सर्वांत मोठी आघाडी आहे. त्यामुळे नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद आमच्याच आघाडीला मिळाले पाहिजे, असे श्री. महाले म्हणाले. गटनेते शहाबाज शाह यांनी सांगितले, की महापौर निवडीनंतर लगेचच सहा फेब्रुवारीला महापौरांकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबतचे पत्र दिले. मात्र १६ फेब्रुवारीला मनपाने तांत्रिक आणि कायदेशीर अभिप्राय घेत असल्याचे पत्र दिले होते. आता महापालिकेने खंडपीठाच्या आदेशानुसार योग्य निर्णय न घेतल्यास खंडपीठात पुन्हा दाद मागितली जाईल.
-