धुळे ः टुडे २ साठी
--
फोटो क्रमांक ः 28903
धुळे : अवैध व्यवसायांप्रश्नी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून लेखी आश्वासन स्वीकारताना ॲड. पंकज गोरे व शिष्टमंडळ.
--
युवा सेनेचे उपोषण स्थगित
--
अवैध व्यवसायांचा प्रश्न; पोलिसांकडून आश्वासन
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : शहरातील वाढते अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲड.. पंकज गोरे यांनी सुरू केलेले साखळी उपोषण अखेर नवव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने सर्व अवैध व्यवसायांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे ॲड. गोरे यांनी सांगितले.
गेल्या २७ ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू होते. या काळात ॲड. गोरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रतीकात्मक आंदोलने केली. यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी अवैध व्यवसायांसह ड्रग्ससारख्या अमली पदार्थांबाबत कडक कारवाई सुरू केल्याचे सांगितले. आंदोलकांनी जमा केलेल्या अवैध व्यवसायांविषयी यादीही पोलिस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याचे ॲड. गोरे यांनी स्पष्ट केले. पंकज भारस्कर, संदीप चौधरी, संजय पाटील, सागर निकम, सागर साळवे, डॉ. सुनील पाटील, बंटो गोरे, स्वप्नील सोनवणे, निलेश चौधरी, सौरभ जवराळ, गोकुळ येलमामे, दर्शन खंबायत आदी उपस्थित होते.